"हिरकणी" मधील द्वारपाल आहे 'या' गावचा

रवींद्र साळवी
Tuesday, 12 November 2019

300 वर्षापूर्वीच्या कालखंडात पुन्हा घेऊन जाणारी दृश्‍ये (कला विभाग) अतिशय सुंदर चित्रीकरण, कलाकार या चित्रपटात आहेत. सोनाली कुलकर्णीचा अभिनय लाजबाब झाला आहे. इतर सर्वच कलाकारांचाही उत्कृष्ट अभिनय यामध्ये पाहायला मिळतो. या सर्वांमुळेच हिरकणी चित्रपट हिट ठरला आहे.  

लांजा - "हिरकणी" या चित्रपटात लांजा तालुक्‍यातील अभिनेते अमोल रेडीज यांनी द्वारपाल महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमोलच्या उठावदार भूमिकेमुळे सर्व स्तरावरून अभिनंदन होते आहे. 

हिरकणी हा सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर हिंदी सिनेमाना मागे टाकत मस्त कमाई करत आहे. कथा माहितीची असली तरी तिची उत्कंठावर्धक मांडणी, सुंदर गाणी तितकीच सुंदर कोरिओग्राफी, मनाला ओलं करणारी इतिहासाची आठवण करून देणारे संवाद असून या सिनेमात अमोलने अभिनयातून द्वारपालाची कसदार भूमिका केली आहे. 

यामुळेच ठरला हिरकणी हिट

300 वर्षापूर्वीच्या कालखंडात पुन्हा घेऊन जाणारी दृश्‍ये (कला विभाग) अतिशय सुंदर चित्रीकरण, कलाकार या चित्रपटात आहेत. सोनाली कुलकर्णीचा अभिनय लाजबाब झाला आहे. इतर सर्वच कलाकारांचाही उत्कृष्ट अभिनय यामध्ये पाहायला मिळतो. या सर्वांमुळेच हिरकणी चित्रपट हिट ठरला आहे.  

भांबेडचा कलाकार हिरकणीत

हिरकणी पाहून बाहेर पडल्यावर काही दृश्‍ये काही कलाकारांच्या मनात ठाण मांडून बसतात, मुख्य कलाकारांसोबत अजून एक कलाकार लक्षात राहातो तो म्हणजे बजाजी, रायगडच्या मुख्य दरवाज्याचा द्वारपाल, ही भूमिका साकारली आहे लांजा तालुक्‍यातील भांबेड या गावच्या अमोल रेडीज यांनी.

अमोलला मिळाली यांच्यामुळे संधी

छोटीशी पण महत्त्वपुर्ण भूमिकेमुळे अमोल याने अभिनयाचा ठसा उमटवून प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. कास्टिंग डिरेक्‍टर रोहन मापूस्कर यांची ही पात्र निवड अतिशय योग्य ठरली. जिल्ह्यातील अनेक कलाकारांना रुपेरी पडद्यावर आणण्यात त्यांचे योगदान आहे. त्यांनी अमोल रेडीज या कलाकाराला अनेक मोठ्या सिनेमात कामाची संधी उपलब्ध करून दिली आहे. लाल मातीतील या कलाकारांकडे गुणवत्ता असून भविष्यात त्यांना चांगले सिनेमे मिळतील. हिरकणी हा सिनेमा रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या आठवड्यातही जोमाने सुरू आहे. आपल्या मुलांसाठी आई काय असते ?, मुलांसाठी काय करू शकते?  हे दाखवणारा हा सिनेमा पहावा असाच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hirkani Actor Amol Redij From Lanja Taluka