esakal | निकचा 'तो' व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, "Don't mind प्रियांका...
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra and Nick jonas Holi Celebration Video Vral on Social Media

निक जोनास याने प्रियांकासह भारतीय पंरपरनुसार होळी सण साजरा केला आहे. होळीसाठी त्यांने पांढऱ्या रंगाचे भारतीय पेहराव केला होता. भारतीय सणांसाठी निकच्या या उत्साहाचे कौतुक होत आहे.

निकचा 'तो' व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, "Don't mind प्रियांका...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बॉलीवूडची देसी गर्ल आणि निक जोनास हे हॉट कपल नेहमीच सोशल मिडियात चर्चेत असते. होळी पार्टीच्या निमित्ताने हे कपल पुन्हा चर्चेत आले आहे. होळी साजरी करण्यासाठी प्रियांका पती निकसह भारतात आली आहे. अंबानी कुटुंबाच्या  होळी पार्टीत या कपलनेही हजेरी लावली होती.  यावेळी प्रियांका आणि निक यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


निक जोनास याने प्रियांकासह भारतीय पंरपरनुसार होळी सण साजरा केला आहे. होळीसाठी त्यांने पांढऱ्या रंगाचे भारतीय पेहराव केला होता. भारतीय सणांसाठी निकच्या या उत्साहाचे कौतुक होत आहे. होळी पार्टीत एका व्हिडिओमध्ये निक प्रियांकाच्या ड्रेसला हात पुसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. काहींना या व्हिडिओवर डोन्ट माईंड प्रियांका, बुरा ना मानो होली है'' अशा कमेंट्स केले आहे. या व्हिडिओत निक आणि प्रियांकाचे स्ट्राँग बॉन्ड दिसत असून दोघे खूप आनंदी असल्याचे दिसते.  


प्रियांका आणि निकला सोशल मिडियावर सतत ट्रोल केले जाते.  प्रियांका आणि निकच्या लग्नाला 1 वर्ष झाले असूनही त्यांना वयातील फरकावरुन  ट्रोल केले जाते . दोघांच्या वयात 10 वर्षाचा फरक आहे. प्रियांकाने कित्येकदा ट्रोलर्सला उत्तर दिले  पण निक मात्र काहीच बोलला नव्हता. या ट्रोलिंगला  ''माझी पत्नी 37 वर्षाची आहे याचा मला काहीही फरक पडत नाही, असे उत्तर निकने पहिल्यांदा दिले आहे.