बाँलीवुड पुरते ‘ झिंगले, बुंगले अन गुंगले ’

bollywood-indian-hindi language-film-industry
bollywood-indian-hindi language-film-industry

मुंबई : १४ जुन रोजी आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांतसिंग रजपुत याने आत्महत्या केली. त्यावरुन बाँलीवुडमध्ये  मोठे वादळ निर्माण झाले. आता या आत्महत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय, ईडी आणि एनसीबी अशा तीन तपासयंञणांकडुन तपासाला सुरुवात झाली. माञ अलीकडच्या काही दिवसांपासुन तपासाची दिशा भरकटल्याचे दिसुन येत आहे. तपास थेट बाँलीवुडच्या ड्रग्ज कनेक्शनपर्यत गेला. त्यात हिंदी चिञपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. विशेषत; अभिनेञींची नावे आहेत. वेगवेगळ्या पार्ट्यामध्ये ड्रग्ज घेऊन मदहोष होणा-या या तारकांमुळे बाँलीवुड माञ बदनाम झाले आहे.

आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन समन्स पाठविण्यात आले आहे. यात दिपिका पदुकोण, सारा अली खान, रेहा चक्रवर्ती, सँम्युएल मिरांडा, जया साहा, दिया मिर्झा, करिश्मा प्रकाश, रकुल प्रित सिंग, श्रध्दा कपुर, शोविक चँटर्जी, श्रृती मोदी, दीपेश सावंत, सिमोन खंबाटा आणि ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापुढील काळात आणखी ५० कलाकारांची नावे एनसीबीकडे तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. एनसीबीला सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही ड्रग चँट मिळाले. तिथुन या घटनेला वेगळा रंग येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रेहा चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली. पुढे तिचा भाऊ शौविक याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अद्याप रेहाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ती सहा आँक्टोबरपर्यत वाढविण्यात आली आहे. यानंतर सुशांतच्या स्टाफमधील दिपेश सावंत आणि सँम्युएल मिरांडा यांना अटक केली आहे.

एवढं सगळं होत असताना तपास केवळ ड्रग्जभोवती फिरत आहे. त्यातुन दररोज नवनवीन नावे समोर येत असल्याने तपास थोडा भरकटत तर नाही ना, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बाँलीवुडमधील प्रख्यात अभिनेञी दिपिका पदुकोण हिचे आँक्टोबर २०१७ मध्ये ड्रग्ज देवाणघेवाणी संदर्भात झालेले संभाषण माध्यमांच्या हाती लागल्याने तिची मोठी पंचाईत झाली. यामुळे ती आणखी खोलवर रुतत जात असल्याचे चिञ आहे. त्यानंतर लागलीच सारा अली खान आणि श्रध्दा कपुरचे  नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली. या दोघींचा सुशांतशी संबंध म्हणजे साराने त्याच्याबरोबर केदारनाथ नावाचाज चिञपट केला. तर श्रध्दा कपुरने चिछोरेमध्ये एकञ काम केले. सुशांतनेच त्याच्या फार्म हाऊसवर दिलेल्या एका पार्टीमध्ये त्यांनी ड्रग्ज घेतल्याच्या चर्चेला तोंड फुटले.

रेहाने चौकशीत साराचे नाव घेतले. ते का याचे उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल. सध्या इतर जी नावे आहेत त्यामागील ‘ लिंक ’ काय याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सतत सोशल मीडियातुन त्याचा होणारा प्रचार यामुळे त्याला वेगळे वळण मिळाले असे म्हणता येईल. सुरुवातीला सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर तो बिहार पोलिसांनी केला. आता तो तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

 गुंगीत असलेल्या बाँलीवुडचे नवीन अपडेट काय आहेत

* गोव्यावरुन आलेल्या दीपिकाची एनसीबी करणार चौकशी

·* सुरुवातीला रकुल प्रीत सिंगने आपल्याला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तिला देखील एनसीबीकडुन नोटीस प्राप्त झाल्याची माहिती पुढे आली आहे.

 * केदारनाथ चिञपटातुन साराने सुशांत बरोबर बाँलीवुडमध्ये पदार्पण केले. माञ यापुढील काळात तिच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

* श्रध्दा कपुरची डोकेदुखी वाढली आहे. ड्रग्ज घेतल्याप्रकरणी तिचे संभाषण आँनलाईन व्हायरल झाले आहे. शनिवारी तिला एनसीबीकडुन समन्स काढण्यात येणार असल्याचे समजते.

* सुशांत बरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणा-या रेहाने सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याचे म्हटले आहे. पुढील तपासात हा मुद्दा महत्वाचा ठरणार का, तसेच तिने म्हटल्याप्रमाणे यात कितपत तथ्य आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरण्याची शक्यता आहे.

* रेहाचा भाऊ असणा-या शोविक विरोधात सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली आहे. तसेच सीबीआयकडुन त्याची चौकशी करण्यात आली आहे.

* डीआरडी आँफिसकडुन सुशांतचा मँनेजर असणा-या सँम्युएल मिरांडाला बोलावणे आल्यानंतर सीबीआयकडुन त्याची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे.

* श्रृती मोदीची यापुर्वी ईडीकडुन चौकशी करण्यात आली आहे. ती सुशांतची बिझनेस मँनेजर आहे.

* आतापर्यंत जे ड्रग्ज संभाषण समोर आले आहे त्यात प्रामुख्याने जया शहाचे नाव पुढे असुन अभिनेञी श्रध्दा कपुरसोबतचे संभाषण विशेष चर्चेत आहे

* सुशांतला घरकामात मदत करणारा दिपेश सावंत याचा ड्रग व्यवहारात सक्रिय सहभाग असल्याचे एनसीबीला दिसुन आले आहे.

* या सगळ्या प्रकरणात विनाकारण आपले नाव गोवण्यात आल्याचे दिया मिर्झाचे म्हणणे आहे. आजवर आपण कधीही कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचेही तिने म्हटले आहे.

* सिमाँन ही एक फँशन डिझायनर म्हणुन प्रसिध्द आहे. तिलाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे.

* दीपिकाची मँनेजर म्हणुन करिश्मा प्रकाश समोर आली असुन तिच्याकडेही या प्रकरणात संशयित म्हणुन पाहिले जात आहे.

* ध्रुव चितगोपेकर याची आतापर्यत दोनवेळा एनसीबीकडुन चौकशी करण्यात आली आहे. तो एका संस्थेचा कार्यकारी अधिकारी आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com