‘छपाक’चा ट्रेलर लवकरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

हा चित्रपट ॲसिड हल्ला झालेली लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या अभिनयाने बॉलीवूडवर चांगलीच भुरळ घातली आहे. आता लवकरच ती ‘छपाक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट ॲसिड हल्ला झालेली लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटात दीपिका मालती नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याआधी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज आणि दीपिकाचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. नुकतीच या चित्रपटाच्या ट्रेलर संदर्भात माहिती सोशल मीडियाद्वारे समोर आली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर ‘वर्ल्ड ह्युमन राइट्‌स’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिकाने या चित्रपटाच्या ट्रेलर संदर्भात तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ ही पोस्ट केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० चित्रपटगृहात दाखल होणार आहे.   

web title : The 'Chhapak' trailer will release soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  The 'Chhapak' trailer will release soon