कतरिनाचा समुद्रात माशासोबत पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल..पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

वर्ल्ड ओशिएन डे च्या निमात्ताने कतरिनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिबुड अभिनेत्री कतरिना कैफ लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडीयावरती चांगलीच एक्टीव आहे, कोरोना व्हायरसमुळे नागरीकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले असतानाच कतरिना सोशल मिडीयावर चाहत्यांसोबतचे व्हिडीओ  शेअर करत आहे. नुकताच तीने स्वतःच्या इंस्टाग्राम आकांऊटवर पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अखेर ठरलं! या तारखेपासून मराठी रामायणाचे प्रसारण सुरू होणार

कतरिनाने तीचा एक जूना व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये कतरिना खोल समुद्रामध्ये पोहताना दिसत आहे. तीच्या सोबत एक मोठा व्हेल मासा देखील पोहताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मिडीयावर कतरिनाचे चाहते या व्हिडीओला चांगलीच पसंती दाखवत आहेत. वर्ल्ड ओशिएन डे च्या निमात्ताने कतरिनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “माहासागरात एका सुंदर दिवशी, माझ्या सगळ्यात अनोख्या मित्रासोबत” अशे कॅपशन तीने व्हिडीओला दिले आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#tb to A beautiful day in the ocean with my most incredible friend

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

कतरिनाचा शेवटचा चित्रपट हा सलमान खानसोबत आलेला भारत हा होता. लवकरत कतरिना कैफ अक्षय कुमारसोबत सुर्यवंशी हा चित्रपट दिसणार आहे. रोहित शेट्टी याने दिगदर्शीत केलेला हा चित्रपट 24 मार्च रोजी रिलीज होणार होता पण कोरोना व्हायरसमुळे तो अडकून पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Katrina kaif swimming in ocean with big fish video viral on internet on world ocean day