Who is Sheetal Thakur wife of 12th Fail actor Vikrat Massey :
Who is Sheetal Thakur wife of 12th Fail actor Vikrat Massey :esakal

Vikrant Massey Love Story : '12 वी फेल' मधल्या विक्रांतची खऱ्या आयुष्यातली 'लवस्टोरी' माहितीये, कोण आहे शितल ठाकूर?

विधु विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले.

Who is Sheetal Thakur wife of 12th Fail actor Vikrat Massey : विधु विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले. अवघ्या २० कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ७० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन वेगळी ओळख तयार केली. या सगळ्यात सर्वाधिक कौतुक झालं ते आय़पीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीचं.

विक्रांतनं मनोज कुमार यांची भूमिका साकारताना त्यात जीव ओतून साकारलेलं ते पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं. चंबल का हू मैं....असं ठणकावून सांगणाऱ्या मनोजनं बारावी नापास झालो म्हणून हार न मानता आयपीएस पदाला गवसणी घातल्याचे दिसून आले. या अधिकाऱ्याची भूमिका विक्रांतनं ज्या प्रभावीपणे पार पाडली त्याला तोड नाही असे अनेक कलाकारांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशननं देखील या चित्रपट निर्मात्यांचे कौतुक केले होते.

१२ वी फेल हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्यात चर्चा रंगली आहे ती विक्रांतच्या खऱ्या आय़ुष्यातली लवस्टोरीची. विक्रांतविषयी सांगायचे झाल्यास त्यानं यापूर्वी मिर्झापूर, क्रिमिनल जस्टीस सारख्या मालिकांमध्ये काम करुन चाहत्यांना जिंकून घेतले आहे.त्याच्या हसीन दिलरुबामधील परफॉर्मन्सला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कोण आहे विक्रांतची पत्नी....

विक्रांतच्या पत्नीचं नाव शितल ठाकूर असे आहे. १३ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये तिचा जन्म झाला. तिनं चंदीगढमधील शाळेतून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिनं दिल्लीतील एका महाविद्यालयातून बी टेकची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना शितलनं फेमिना मिसचा खिताब आपल्या नावावर केला होता. त्यानं तिनं २०१२ रोजी मॉडेलिंगला सुरुवात केली होती.

शितलनं अनेक टीव्ही ब्रँडसची सुरुवात केली होती. ती सध्याची आघाडीची अभिनेत्री पंजाबी अभिनेत्री आहे. तिनं २०१६ मध्ये बंबूकाट नावाच्या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर तिनं काही वेबसीरिजमध्ये देखील काम केले होते. त्यात अपस्टार्टस, बृजमोहन अमर रहे आणि छप्पर भार यांचा समावेश आहे.

विक्रांत अन् शितलची लवस्टोरी...

विक्रांत आणि शितलची लवस्टोरी ही बऱ्यापैकी फिल्मी असल्याचे सांगण्यात येते. त्यांची पहिली भेट ब्रोकन बट ब्युटीफुल नावाच्या मालिकेच्यावेळेस झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली अन् त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बरेच वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये आपल्या नात्याची घोषणा करत २०२२ रोजी लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com