12th Fail OTT Release: २०२३ मध्ये गाजलेला '12th Fail' या आता या OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या

12th Fail हा सिनेमा आता OTT वर रिलीज होणार आहे
12th fail movie on ott release date hotstar starring vikrant massey vidhu vinod chopra
12th fail movie on ott release date hotstar starring vikrant massey vidhu vinod chopra SAKAL

12th Fail OTT Release Date: विक्रांत मस्से स्टारर '12th Fail' हा 2023 मध्ये रिलीज झालेल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे आणि या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २०२३ मध्ये अनेक सुपरस्टारचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर लोकप्रिय ठरले.

पण या सर्व बड्या चित्रपटांच्या गर्दीत विक्रांत मेस्सीचा '12th Fail' सिनेमा चांगलाच गाजला. ज्यांना '12th Fail' थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. '12th Fail' आता OTT वर रिलीज होणार असून प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे.

12th fail movie on ott release date hotstar starring vikrant massey vidhu vinod chopra
Who is Radha Rama Mannar: प्रभासच्या 'सालार'मधली 'राधा रमा मन्नार' नक्की कोण? जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल रंजक गोष्टी

12th Fail ची OTT रिलीज डेट

29 डिसेंबर 2023 रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर '12 th Fail' रिलीज होईल.

'12th Fail' ची OTT रिलीज डेट जाहीर करताना, Disney+ Hotstar ने लिहिले, "जर 2024 सुरू होण्याआधी तुम्ही एखादा चित्रपट पाहणे आवश्यक असेल, तर तो #12thFail असावा! 29 डिसेंबर रोजी स्ट्रीमिंग होतोय."

अशी घोषणा डिस्ने हॉटस्टारने केलीय.

12th Fail बद्दल थोडंसं

'12th Fail' हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची गोष्ट आपल्याला दाखवतो. शैक्षणिक प्रवास पुन्हा सुरू करुन जगातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा UPSC क्रॅक करणाऱ्या मनोजचा प्रेरणादायी प्रवास सिनेमात दिसतो.

विधू विनोद चोप्रा लिखित आणि दिग्दर्शित, '12th Fail' अनुराग पाठक यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.'12th Fail' च्या ओटीटी रिलीजबद्दल बरीच अटकळ होती. पण आता निर्मात्यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. सिनेमात विक्रांत मस्सेने प्रमुख भूमिका साकारुन सर्वांकडून वाहवा मिळवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com