Tanhaji Promo : 'एक तरफ मुघलों की आँधी, दुसरी तरफ मुठ्ठीभर मराठा'

टीम ईसकाळ
Saturday, 16 November 2019

तानाजी मालुसरेंच्या गौरव गाथेवर आधारित 'तानाजी : द अनसंग वॉरियर चित्रपट बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. काल व आज काजोलने या चित्रपटाचे टीझर रिलीज केले.

'तानाजी : द अनसंग वॉरियर'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट आणि अजय देवगण चर्चेत आहे. तानाजी मालुसरेंच्या गौरव गाथेवर आधारित हा चित्रपट बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. काल व आज काजोलने या चित्रपटाचे टीझर रिलीज केले. यापूर्वी काजोलने तानाजी मालुसरे, शिवाजी महाराज, जिजाबाई, औरंगजेब यांचे पोस्टर रिलीज केले होते. आज शेअर केलेल्या टीझरमुळे पुन्हा एकदा तानाजी बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

धक्कादायक! अभिनेत्रीला दुखापत, शुटिंगही थांबले!

रात्रीची वेळ आहे आणि अवाढव्य अशा कोंढाण्यावर मावळे आणि मुघलांमध्ये लढाई होणार आहे. 'एक तरफ मुघलों की आँधी और दुसरी तरफ मुठ्ठी भर मराठा' असा भारदस्त आवाज... असा 12 सेकंदांचा टीझर रिलीज झाला आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात तानाजी मालुसरे व सिंहगडावरील लढाईला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे हे प्रोमो बघताना अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही. तर दुसऱ्या टीझरमध्ये सिंहगड व हातात भगवा घेऊन उभे असलेले तानाजी मालुसरे दिसत आहेत. 'स्वराज से बढकर क्या...' अशी या टीझरची पंच लाईन आहे. 

 

मराठमोळा ओम राऊत हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. तर उदयभानाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसेल. तानाजींच्या पत्नीची भूमिका काजोलच साकारणार अशी चर्चा आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. हा चित्रपट अजय देवगणचा 100 वा चित्रपट असल्याने त्याला एक वेगळे व विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 promos released of Hindi movie Tanhaji