esakal | जागतिक संगीतदिनानिमित्त रंगली 'सूरमैफील'
sakal

बोलून बातमी शोधा

3km sakal

जागतिक संगीतदिनानिमित्त रंगली 'सूरमैफील'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पुणे - संगीत ऐकायला आवड नाही असं म्हणणारा, माणूस भेटणं मुश्किल. अर्थात जगात असे काही महाभाग असतातही की ज्यांना सुरावटींची अॅलर्जी असते. जागतिक संगीत दिनाच्या निमित्तानं सकाळच्या 3KM च्या वतीनं सादर केलेला अनोख्या सूरावटींची पर्वणी संगीत दिनाच्या औचित्यानं वेगळी म्हणावी लागेल. त्यात अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता.

सकाळच्या 3 KM या प्लॅटफॉर्म अंतर्गत, जागतिक संगीत दिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक कलाकारांनी सादरीकरण करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पुण्यातील संगीतकारांना एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम या निमित्तानं करण्याचा सकाळ 3 KM चा मानस यशस्वी झाल्याचे दिसून आले.

या सुंदर सुरावटींच्या मैफलीत नीरज पंडित, प्राजक्ता डोईफोडे, अन्वय आहेर, अनुराग प्रसाद, योगेश मार्कंड, स्वराली आलेगांवकर, इशान लेले, विनित देशपांडे, कौस्तूभ देशपांडे, अथर्व सुदामे, प्रसन्न थोपटे यांनी सहभाग घेतला होता.

वेगवेगळ्या सदाबहार गीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. त्याला उपस्थित श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खासकरुन हिंदी चित्रपट विश्वातील 70 ते 80 च्या दशकातील गाण्यांचा त्यात समावेश करण्यात आला होता. तरुण गायकांनी किशोर कुमार, आर डी बर्मन, मुकेश, यांच्या गीतांचा आळवलेला सूर उपस्थितांची दाद मिळवत होता.

loading image