तेव्हा पुरुष कलाकार स्त्रियांना.. ५० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ शेयर करून Zeenat Aman यांनी सांगितलं मनातलं दुःख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zeenat aman, zeenat aman news

तेव्हा पुरुष कलाकार स्त्रियांना.. ५० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ शेयर करून Zeenat Aman यांनी सांगितलं मनातलं दुःख

Zeenat Aman News: ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाल्या आहेत. झीनत यांनी ५० वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलाय.

या व्हिडिओच्या माध्यमातून झीनत यांनी तेव्हाची सिनेमात असणारी महिलांची परिस्थिती कशी होती याचं वर्णन केलंय. झिनत यांनी शेयर केलेली इंस्टाग्राम पोस्ट फार महत्वाची आहे.

(50 years old video was shared by zeenat aman)

झीनत अमान व्हिडिओ शेयर करून लिहितात.. 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात, ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशनचे कीथ अॅडम कुर्बानीच्या सेटवर आले, जिथे मी 'लैला ओ लैला' साठी रिहर्सल करत होते आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली.

हे फुटेज शूट होऊन जवळपास 50 वर्षे झाली आहेत आणि तेव्हापासून उद्योग खूप बदलला आहे.

महिलांसाठी उपलब्ध भूमिका आता केवळ शोभेच्या राहिलेल्या नाहीत. तरीही काय बदलले नाही ते म्हणजे समान मानधन.

माझ्या काळात "सर्वाधिक मानधन घेणारी महिला अभिनेत्री" म्हणून माझे कौतुक केले जात असे, परंतु माझे पुरुष सह-कलाकार आणि माझ्यातील वेतन यात असमानता इतकी मोठी होती की ते हास्यास्पद होते.

या क्लिपमध्ये तुम्ही जी झीनत पाहत आहात ती ५० वर्षांपूर्वीची आहे. आजही चित्रपटसृष्टीतील महिला आणि पुरुष यांच्या मानधनात मोठी तफावत आहे. याची मला निराशा आहे.

महिलांनी सातत्याने काम केले आहे, आणि मला खरोखर वाटते की आता आपल्या महिलंनी त्यांना योग्य मानधन मिळावं यासाठी स्वतः जबाबदारी घेणं गरजेच आहे.

ही इतकी साधी आणि उघड गोष्ट आहे.. पण एका महिलेने हा बदल केला तरीही ते क्रांतिकारक ठरेल.

अशाप्रकारे झीनत अमान यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेयर करून महिला आणि पुरुष कलाकारांमध्ये असलेल्या मानधनाच्या फरकाबद्दल भाष्य केलंय.

अनेकांनी ५० वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ पाहून नॉस्टॅल्जिक होण्याचा आनंद घेतलाय याशिवाय झीनत अमान यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे.

झीनत सध्या ७१ वर्षांच्या असून त्या सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून जुन्या नव्या आठवणींना उजाळा देत असतात.

टॅग्स :Marathi News Bollywood