esakal | Filmfare Marathi Awards 2020 : 'आनंदी गोपाळ'च्या टीमवर पुरस्कारांचा वर्षाव

बोलून बातमी शोधा

anandi gopal}

हा पुरस्कार सोहळा येत्या १४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जाईल.

Filmfare Marathi Awards 2020 : 'आनंदी गोपाळ'च्या टीमवर पुरस्कारांचा वर्षाव
sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२०चं पाचवं पर्व नुकतंच पार पडलं. हा पुरस्कार सोहळा कलर्स मराठीवर येत्या १४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केला जाईल. या पुरस्कार सोहळ्यात ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाला विविध विभागांमध्ये तब्बल १६ नामांकनं मिळाली होती. तर अमेय वाघ व सई ताम्हणकर यांच्या गर्लफ्रेंड चित्रपटाला १५ नामांकनं मिळाली होती. कोणाला कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत, ते पाहुयात..

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - शिवानी सुर्वे, ट्रिपल सीट
सर्वोत्कृष्ट पदार्पण, दिग्दर्शक- सलील कुलकर्णी, वेडिंगचा शिनेमा
सर्वोत्कृष्ट चित्रपट- आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षकांची पसंती)- बाबा
मराठी चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी- महेश कोठारे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- समीर विद्वांस, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका)- दीपक डोब्रियाल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका)- मुक्ता बर्वे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षकांची पसंती)- ललित प्रभाकर, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षकांची पसंती)- सोनाली कुलकर्णी- हिरकणी, भाग्यश्री मिलिंद- आनंदी गोपाळ

हेही वाचा : अभिज्ञानंतर आता मितालीच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे, कागर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नीना कुळकर्णी, मोगरा
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर, खारी बिस्किट
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम- आनंदी गोपाळ, सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी
सर्वोत्कृष्ट गीत- क्षितीज पटवर्धन, तुला जपणार आहे (खारी बिस्किट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- आदर्श शिंदे, खारी बिस्किट (तुला जपणार आहे)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- शाल्मली खोलगडे, गर्लफ्रेंड (केरिदा केरिदा)
सर्वोत्कृष्ट कथा- मनिष सिंह, बाबा
सर्वोत्कृष्ट पटकथा- करण शर्मा, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णिक, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- सुनील नागवेकर आणि निलेश वाघ, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी)- आकाश अगरवाल, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- चारुश्री रॉय, आनंदी गोपाळ
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- सौरभ भालेराव, गर्लफ्रेंड
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर, फत्तेशिकस्त
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- राहुल ठोंबरे आणि संजीव होवळादार (माझी स्टोरी क्युट वाली स्वीट वाली लव्ह स्टोरी- गर्लफ्रेंड)
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- पूर्णिमा ओक, फत्तेशिकस्त