72 Hoorain Day 1 Collection: 72 हुरें काही प्रेक्षकांना पटेना! पहिल्या दिवशी केली फक्त इतकीच कमाई..

72 Hoorain Day 1 Collection:
72 Hoorain Day 1 Collection: Esakal

72 Hoorain Day 1 Collection: 72 हुरें या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. अनेक लोकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे, आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळला. या चित्रपटाचे रिव्हूदेखील ठिक होते. हा चित्रपट हिंदीसह आणखी 9 भाषांमध्ये रिलिज करण्यात आला आहे.

72 Hoorain Day 1 Collection:
Lee Sang Eun Death: परफॉर्मन्सच्या आधीच गायिकेचं निधन, वॉशरुममध्ये सापडला मृतदेह

दहशतवादी बनण्यासाठी सामान्य माणसाचे ब्रेनवॉश कसे केले जाते आणि तो आमिषाला कसा बळी पडतो याची थोडक्यात कहानी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहे.

(72 Hoorain Movie Review)

SacNilk च्या रिपोर्टनुसार, 10 करोडच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ 50 लाखांच्या जवळपास गल्ला जमवला आहे.

हे कलेक्शन पाहता या चित्रपटाला खुपच कमी आणि निराशाजनक ओपनिंग मिळाली आहे. त्यामुळे आता विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होते की नाही याकडे निर्मात्यांचे लक्ष आहे.

72 Hoorain Day 1 Collection:
Adipurush Manoj Muntashir: मी चुकलो.. अखेर आदिपुरुषच्या लेखकाने हात जोडून मागीतली माफी

विकेंडला जर कमाईत काही वाढ झाली नाही तर हा चित्रपट फ्लॉप चित्रपटाच्या यादित समिल होइल असं बोललं जात आहे.

'द केरळ' स्टोरी किंवा 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावर नजर टाकली असता अदा शर्माच्या द केरळ स्टोरीनं पहिल्या दिवशी 8 कोटींची कमाई केली होती. तर 'द कश्मीर फाइल्स'नेही पहिल्या दिवशी 3.55 कोटी कमावले. त्यातुलनेत 72 हुरेंने खुपच निराशाजनक कमाई केली आहे.

(72 Hoorain Box Office Collection Day 1)

72 Hoorain Day 1 Collection:
Anupam Kher Tagore: अनुपम खेर साकारणार रविंद्रनाथ टागोर, अभिनेत्याचा लुक पाहून फॅन्सना सुखद धक्का

72 हुरेंच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर यात दोन पाकिस्तानी मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. जे भारतात आत्मघातकी हल्ला करण्यासाठी येतात. त्यांना सांगितले जाते की त्यांनी असे केले तर त्यांना जन्नत मिळेल आणि तिथे 72 हुरें असतील.

(72 Hoorain's producer Ashoke Pandit)

त्यातच अलीकडेच, चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांनी धमक्या मिळाल्याबद्दल बोलले आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी अशोक पंडित यांना सुरक्षा पुरवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com