रणवीरच्या '83' मध्ये आदिनाथ कोठारे साकारणार 'या' क्रिकेटरची भूमिका

वृत्तसंस्था
Tuesday, 21 January 2020

सिनेमा ''83'' ची चर्चा सध्या सुरु आहे. या चित्रपटामध्ये भारतीय क्रिके़ट टीम दिसणार आहे आणि त्यामध्ये आहे मराठमोळा आदिनाछ कोठारे. पाहा त्याचा चित्रपटातील लुक कसा आहे. 

मुंबई : रणवीर सिंगचं नाव बॉलिवूडच्या टॉप स्टारमध्ये समाविष्ट झालं आहे असं म्हणटलं तर वावगं ठरणार नाही. रणवीरचा मागिल वर्षी 'गल्ली बॉय' चित्रपट रिलिज झाला आणि त्याची हवा फक्त भारतात नाही तर परदेशातही झाली. आताही तो मनोरंजनाचा नवा तडका घेऊन एका जबरदस्त चित्रपटासह येत आहे. त्याचा आगामी सिनेमा ''83'' ची चर्चा सध्या सुरु आहे. या चित्रपटामध्ये भारतीय क्रिके़ट टीम दिसणार आहे आणि त्यामध्ये आहे मराठमोळा आदिनाछ कोठारे. पाहा त्याचा चित्रपटातील लुक कसा आहे. 

रणवीर सिंगचा 83 हा सिनेमा क्रिकेटवर आधारीत आहे. भारतीय विश्वचषकाच्या विजयाची कथा या सिनेमातून मांडली जाणार आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने  1983 मध्ये विश्वचषक भारताच्या नावावर केला होता. कपिल देव यांच्या भूमिकेच रणवीर सिंग दिसणार आहे. क्रिकेटसंघातील इतर खेळाडूंच्या भूमिकेत अनेक कलाकारांची टीम आहे. यामधलं एक नाव आहे ते आदिनाथ कोठारे. आदिनाथ दीलिप वेंगसरकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे. 

आदिनाथच्या लुकवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद देत लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. दीलिप वेंगसरकर यांच्यासोबतचा फोटोही त्याने शेअर केला आहे. सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी ताहिर राज भसीन, के. श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी जीवा, मोहिंदर अमरनाथ यांच्या रूपात साकिब सलीम, यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत जतिन सरना, संदीप पाटिल यांच्या रूपात चिराग पाटिल, कीर्ती आझाद यांच्यासाठी दिनकर शर्मा, रोजर बिन्नी यांच्या भूमिकेसाठी निशांत दहिया, मदन लाल यांच्यासाठी हार्डी संधू आणि सैयद किरमानी यांच्यासाठी साहिल खट्टर तसेच बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेसाठी एम्मी विर्क ही मंडळी दिसणार असून त्यांचे पोस्टर रिलिज करण्यात आले आहेत. 

चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. तर, दीपिका पदुकोन, कबीर खान, साजिद नाडीयादवाला, मधू वर्मा यांनी निर्मितीकरण केलं आहे. 20 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s coming  @83thefilm

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 83 new poster Ranveer Singh introduces Adinath Kothare