Aai Kuthe Kay Karte: लाख विघ्न पार करून अखेर अरुंधती आणि आशुतोष विवाहबंधनात अडकले.. फोटो viral.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

Aai Kuthe Kay Karte: लाख विघ्न पार करून अखेर अरुंधती आणि आशुतोष विवाहबंधनात अडकले.. फोटो viral..

Aai Kuthe Kay Karte: सध्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण आई म्हणजेच अरुंधतीनं आपला मित्र आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेते. या निर्णयात तिला अनेक अडचणी येतात पण त्या लाख अडचणींचा सामना करून अखेर हे लग्न यशस्वी झाले आहे.

नुकतेच या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. मालिकेत हा सोहळा दिसायला अवकाश असला तरी अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचे खास क्षण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

(Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral)

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

पहिलं लग्न, तीन मुलं आणि पंचवीस वर्षांचा संसार मोडून अरुंधतीला हा निर्णय स्वीकारणं थोडं अवघड होतं पण तिने ते केलं. नवऱ्याने फसवणूक केलेली असतानाही बाईने त्याच्या कलाने घ्यायला हवं अशी मानसिकता समाजाची असते. त्यामुळे अनिरुद्धने दुसरं ;लग्न करूनही अरुंधतीने मात्र मुलांचा विचार करून दुसरं लग्न करून नये यासाठी अनिरुद्ध, त्याची आई कांचन आणि मुलगा अभिषेक प्रयत्न करत होते. पण अरुंधतीने कुणालाही न जुमानता ती स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली.

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

अरुंधतीने तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि तिच्यासाठी थांबलेल्या आशुतोषची निवड केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागले पण ती बधली नाही. अखेर त्या दोघांनी लग्नगाठ बांधलीच.

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

अरुंधती आणि आशुतोषचं हे लग्न धुमधडाक्यात पार पडलं. विशेष म्हणजे अप्पांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे हे लग्नं देशमुखांच्या घरात म्हणजे अरुंधतीच्या पहिल्या सासरी अगदी थाटात पार पडलं. यावेळी अरुंधती एखाद्या नववधू सारखी दिसत होती.

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

Aai Kuthe Kay Karte arundhati ashutosh wedding photo viral

विशेष म्हणजे दोघांनीही लग्न खूप एंजॉय केलं. आणि त्यांचा जोडाही सुरेख दिसतो आहे. अरुंधती आता नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच मालिकेत दोघांचा विवाह सोहळा दाखवण्यात येणार असून प्रेक्षकांना तो पाहता येईल.

टॅग्स :Marathi Serialstar pravah