'आई कुठे काय करते'मधल्या 'अरुंधती'चा लहानपणीचा फोटो व्हायरल

तुम्ही पाहिलात का मधुराणी यांच्या लहानपणीचा फोटो?
aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar
aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar file image
Updated on

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मधुराणी या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मधुराणी यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एका बाजूला लहानपणीचा आणि दुसऱ्या बाजूला आताचा लूक एकत्र करून त्यांनी पोस्ट केला आहे. 'स्टाइल मे रहने का' असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत मधुराणी यांचं कौतुक केलं आहे. सध्या मधुराणी यांनी तब्येतीच्या कारणास्तव काही दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मात्र त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar
'मेहंदी है रचनेवाली'; गोव्यात मौनी रॉयच्या लग्नाची धूम!

मालिकेत मधुराणी यांच्यासोबतच मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांच्याही मुख्य भूमिका आहेत. नुकताच मालिकेत अनघा-अभिषेकच्या लग्नाचा थाट पहायला मिळाला. या लग्नाच्या शूटिंगदरम्यान सेटवर कलाकारांनी खूप धमाल केली. त्याचे किस्से, व्हिडीओ, फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com