Madhurani Prabhulkar: फसवणूक प्रकरणी अखेर आई बोललीच.. मधुराणीची पोस्ट चर्चेत..

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर यांची फसवणूक झाल्या प्रकरणी अखेर स्पष्टीकरण..
aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar gives clarification on ganpatipule hotel fraud
aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar gives clarification on ganpatipule hotel fraud sakal

aai kuthe kaay karte: स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची फसवणूक झाल्याची माहिती काल मिळाली आणि एकच खळबळ उडाली. गणपतीपुळे येथील एका हॉटेलात ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक झाल्याचा प्रकार होता. मधुराणीच्या नवऱ्याने म्हणजे प्रमोद प्रमोद प्रभूलकर यांनी एक व्हिडओ शेयर करत ही माहिती दिली होती. परंतु ही प्रकरण काही वेगळेच असल्याचे स्पष्टीकरण अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने दिले आहे.

(aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar gives clarification on ganpatipule hotel fraud )

aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar gives clarification on ganpatipule hotel fraud
Kamal Kishor Mishra: पत्नीला कारने चिरडल्या प्रकरणी अखेर निर्मात्याला अटक! पत्नी म्हणते..

काल दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मधुराणीचे पती प्रमोद यांचा व्हिडओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एका हॉटेलात त्यांची फसवणूक झाल्याचे ते सांगत होते. त्यावरून असे दिसून आले की, प्रमोद प्रभुलकर यांना ऑनलाईन पद्धतीने 17 हजाराचा गंडा घातला गेला. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी त्यांनी ऑन लाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल त्यांनी दोन दिवसासाठी 17 हजार रुपये देऊन बूक केले होते. परंतु तिथे पोहोचल्यावर बूकिंग झाली नसून पैसे मधल्या मध्येच कुठेतरी गेल्याचे समोर आले. सोबत इतरही पर्यटकांचे हजारोंचे पैसे गेल्याने हा मोठा ऑनलाईन घोटाळा असल्याचे समोर आले.

aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar gives clarification on ganpatipule hotel fraud
Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीला नेत्याच्या हॉटेलमध्ये गंडा

पुढे हे प्रकरण वाऱ्यासारखे पसरले. शिवाय हे हॉटेल शिवसेना नेते रवींद्र फाटक यांचे असल्याने या प्रकरणाची अधिकच चर्चा झाली. पण यावर अभिनेत्री मधुराणी कुठेच व्यक्त होताना दिसली नाही. अखेर तिने या प्रकरणावर भाष्य केले आहे. एक फेसबूक पोस्ट लिहून ती व्यक्त झाली आहे.

मधुराणी म्हणते, ''नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडियावर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. कालपासून ' मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ' ' मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ' , अशा बातम्या काही नामांकित वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.

''माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन.''

पुढे ती म्हणते, 'गणपतीपुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा. आणि ह्या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत.' अशी पोस्ट तिने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com