'..अन् पुन्हा एकदा मला भरून आलं'; 'अरुंधती'ची भावनिक पोस्ट

'इंस्टावरच्या एका फॅनपेजनी आज हे शेअर केलं आणि..'
Madhurani gokhale Prabhulkar, Aai Kuthe Kay Karte actress
Madhurani gokhale Prabhulkar, Aai Kuthe Kay Karte actressInstagram

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीतच यशाचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani gokhale Prabhulkar) यांना सोशल मीडियाद्वारेही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. मधुराणी यांच्या एका फॅनपेजने शेअर केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. अरुंधती पडद्यावर साकारल्यापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाले याबद्दलही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. मधुराणी यांनी मालिकेत एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारत आहेत. या मालिकेने टीआरपीचे अनेक विक्रम मोडले आहेत.

मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट-

'आपण आपल्या आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करून पाहतो. आपल्या सोयीच्या परिघाबाहेर पडून काहीतरी नवीन शिकतो, तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो. जशी या छोट्या छोट्या पावलातून अरुंधतीला तिचं स्वत्व सापडत गेलं. इंस्टावरच्या एका फॅनपेजनी आज हे शेअर केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं. आतून कृतज्ञ वाटलं त्या प्रत्येकाविषयी ज्यांच्यामुळे मी ही भूमिका करू शकले आणि करू शकतेय. आज वेगवेगळ्या स्तरातल्या मला अनेक स्त्रिया भेटतात. गृहिणी असतात, शिक्षिका असतात, ऑफिसर असतात, उद्योजिका असतात. वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातल्या.. पण त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात मला भेटून हलकं पाणी असतं. प्रत्येकिला अरुंधती मध्ये ती सापडली असते. कुठल्या न कुठल्या टप्प्यावर तिनी अरुंधतीकडून प्रेरणा घेतलेली असते. अरुंधतीनी तिला धीर दिलेला असतो, सावरलेलं, एक आशेचा किरण दाखवलेला असतो. अगदी मी स्वतः सुद्धा याला अपवाद नाहीये हं! आमची अतिशय गुणी आणि हुशार लेखिका नमिता वर्तक, संवाद लेखिका मुग्धा गोडबोले आणि संवेदनशील दिग्दर्शक रवींद्र करमरकर सर, मी तर आहेच पण अशा असंख्य स्त्रिया तुमच्या आभारी आहेत आणि असतील,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

Madhurani gokhale Prabhulkar, Aai Kuthe Kay Karte actress
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असं काही..

या मालिकेला दादासाहेब फाळके आयकॉनिक अवॉर्ड फिल्म्समध्ये (DPIAF) २०२१ चार पुरस्कार मिळाले आहेत. मधुराणी यांना मराठी टीव्हीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. मालिकेत मधुराणी आणि मिलिंद यांच्यासोबतच अभिनेत्री रुपाली भोसलेची महत्त्वाची भूमिका आहे. खलनायिकेच्या भूमिकेसाठी रुपालीनेही पुरस्कार आपल्या नावे केला आहे. तर मराठी टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून 'आई कुठे काय करते'ला पुरस्कार मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com