Madhurani Prabhulkar: नवरा बायकोचं नातं कसं असावं? अरुंधतीची ही पोस्ट चुकूनही चुकवू नका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared a post about Australia journey and friends mandar and anagha

Madhurani Prabhulkar: नवरा बायकोचं नातं कसं असावं? अरुंधतीची ही पोस्ट चुकूनही चुकवू नका..

Madhurani Gokhale Prabhulkar 'आई कुठे काय करते' या फेम अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही आपल्या घरातलाच एक भाग झाली आहे. या मालिकेतील तीची 'आई' म्हणजेच 'अरुंधती' ही भूमिका प्रचंड लोकप्रिय आहे.

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. सध्या तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

मधुराणी तिची लेक स्वराली सोबत परदेश वारीला गेलीय. दोघीही सिडनी मध्ये सुटयांचा आनंद घेत आहेत. याच निमित्ताने मधुराणी एका दांपत्याच्या घरी राहायला गेली होती. त्यावेळी तिला नवरा बायको कसे असावे याचा प्रत्येय आला.

आणि याच अनुभवातून नवरा बायको कसे असावेत याबाबत मधुराणीने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.

(Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared a post about Australia journey and friends mandar and anagha)

या पोस्ट मध्ये मधूराणीने लिहिले आहे की, 'आमच्या ऑस्ट्रेलिया ट्रिपला चार चाँद लावले ते मंदार अनघा आणि आस्तिक च्या सहवासाने... मंदार माझा तसा लांबचा भाऊ ... त्याला लहानपणापासूनच ओळखते. आणि अनघाचं आणि त्याचं तसं लहानपणीच जमलं त्यामुळे तिलाही अनेक वर्षं.''


''दोघेही प्रचंड हुशार आहेत. मंदार CA तर अनघा भारी लेव्हलची डोळ्यांची डॉक्टर. दोघेही अनेक वर्षं सिडनीमध्ये राहतायत ... तिथेही अतिशय मेहनत आणि एकमेकांना पूर्ण साथ देऊन यांनी स्वतः चं स्थान निर्माण केलंय. ''

''सिडनीत जाऊन त्यांच्याकडे जायचं नाही हे शक्यच नव्हतं.. ३ दिवस त्यांच्याबरोबर आणि अस्तिकबरोबर होतो ...भारी मजा केली... खूप फिरलो आणि खूप खाल्लं...''

'' दोघेही उत्साह आणि हास्याचा झरा आहेत. त्यांच्याबरोबरचे दिवस फार मजेत आणि अखंड हसण्यात गेले.''

''दोघेही एकमेकांना अनेक वर्षे ओळखतात, अगदी कॉलेज पासून .. लग्नाला तर खूपच वर्षं झाली .. पण त्यांच्यातलं मैत्र अजूनही टिकून आहे. कुठेही ते टिपिकल 'नवराबायको' झाले नाहीयेत...''

''आजही अगदी buddies सारखं नातं आहे त्यांच्यात... एकमेकांची खेचतात... टवाळक्या करतात..भांडतात... एकमेकांना तोंडावर काहीही बोलतात.. आम्ही हसून हसून फुटलो... स्वरालीला तर त्यांच्या जोडीच्या प्रेमात पडली ... त्यांची ही मैत्री अशीच आजन्म टिकून राहू दे...'' अशी भावनिक पोस्ट मधुराणीने लिहिली आहे. या पोस्टवर पतीपत्नीचे संबंध कसे असायला हवे हे आपल्याला समजते.