वाईटाशी अती वाईट, अलकाताई म्हणजे वाघीण! मिलिंद गवळींची पोस्ट होतेय व्हायरल

शुक्रवारी अलका कुबल यांचा वाढदिवस झाला, या निमित्ताने अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.
aai kuthe kay karte fame milind gawali birthday wish to actress alka kubal shared emotional post
aai kuthe kay karte fame milind gawali birthday wish to actress alka kubal shared emotional post sakal

Alka kubal : अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. 'माहेरची साडी' सारखे कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे. मग ती 'आई माझी काळूबाई' मालिका असो किंवा 'धुरळा' सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तरी त्यांचा चाहताव वर्ग कमी झालेला नाही. काल शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी, अलका ताईंचा वाढदिवस झाला. या निमित्ताने त्यांचे जुने स्नेही अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट वाचून अनेकांचे लक्ष वेधले आहे. (aai kuthe kay karte fame milind gawali birthday wish to actress alka kubal shared emotional post )

मिलिंद गवळी सध्या सर्वांनाच ठाऊक आहेत. ते 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारत आहेत. त्यांच्या या मालिकेला आणि पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. विशेष म्हणजे अलका ताईंची आणि मिलिंद गवळी यांची फार जुनी ओळख आहे. दोघांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. वैयक्तिक आयुष्यातही अनेकवेळा त्यांनी एकमेकांना मदत केली आहे. मिलिंद अलका ताईंना मोठी बहीण मानतात. म्हणून एक खास पोस्ट त्यांनी केली आहे.

त्यांनी अलका ताईंसोबतचे काही क्षण शेअर करत लिहिले आहे की, 'अलकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी. माहेरची साडी, लेक चालली सासरला यात सोशिक आबला नारी ची भूमिका करणारी अलकाताई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्या दबंग आहे, वाघीण आहे त्या वाघीण, कोणाचेही बापाला न घाबरणारी, चांगल्याशी खूपच चांगलं आणि वाईट अशी एकदम वाईट. आपल्याला मोठी बहीण असली की कसा तिचा आधार वाटतो आपल्याला, मलाही या रूथलेस Ruthless फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईचा खूप आधार मिळाला आहे.'

पुढे ते म्हणतात, 'असंख्य सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं, समीर आणि त्यांच्या होम प्रोडक्शन मध्ये घरचा माणूस म्हणून त्यांनी मला सतत घेतलं. या फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप कमी माणसं आपली फॅमिली होतात,. अलकाताई माझी फॅमिली आहे.' अशी भावनिक पोस्ट त्यांनी लिहिली आहे. या पोस्टमधून सर्वांना वेगळ्या अलकाताईंचे रूप उमगले असून नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com