Suhani Bhatnagar Death : दंगल मधल्या छोट्या बबीताचे निधन! 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हे ठरले मृत्यूचे कारण

सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. ती फक्त १९ वर्षांची होती. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
Suhani Bhatnagar Death Marathi news
Suhani Bhatnagar Death Marathi newssakal

Suhani Bhatnagar Passes Away : 'दंगल' चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी मुलगी सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झाले आहे. ती फक्त 19 वर्षांची होती. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. 'दंगल' सिनेमात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिकेत सुहानी दिसली होती. तिच्या मृत्यूनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दंगल सिनेमानंतर सुहानी सिनेसृष्टीपासून लांब होती आणि ती सोशल मीडियावरही जास्त सक्रिय नव्हती.

सुहानीच्या शरीरात फ्लूइड साठले

सुहानी भटनागरच्या संपूर्ण शरीरात फ्लूइड साठले होते, असे सांगितले जाते. काही काळापूर्वी सुहानीचा अपघात झाला होता, यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान तिने घेतलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला, तिच्या शरीरात हळूहळू द्रव जमा होऊ लागले. तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सुहानीच्या पार्थिवावर फरिदाबादच्या सेक्टर-15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोण आहे सुहानी भटनागर?

सुहानी भटनागर ही बॉलिवूडची प्रसिद्ध बालकलाकार होती. ती आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'दंगल' (2016) मधील बबिता फोगटच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही काम केले आहे.

'दंगल' चित्रपटानंतर सुहानीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, मात्र तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या अभ्यासात लक्ष घालायचे होते. अभिनेत्री 25 नोव्हेंबर 2021 पासून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सक्रिय नव्हती. मात्र, याआधी तिने अनेकदा तिचे फोटो शेअर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com