घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aamir kiran

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण

अभिनेता आमिर खान Aamir Khan व किरण राव Kiran Rao यांनी जरी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं तरी चित्रपट आणि पानी फाऊंडेशनसाठी ते दोघं एकत्र काम करत आहेत. ज्या व्यावसायिक गोष्टींवर आम्हा दोघांचं प्रेम आहे, त्यासाठी एकत्र काम करत राहू, असं आमिरने म्हटलं होतं. याचीच प्रचिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरून आली. दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने सोशल मीडियावर आमिर-किरणसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये दोघंही खूप आनंदी दिसत आहेत. (Aamir Khan Kiran Rao Make Social Media Appearance Post Divorce Announcement)

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. 'कृतज्ञ' असं कॅप्शन देत नाग चैतन्यने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घटस्फोटानंतरही आमिर-किरणने चाहत्यांसाठी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामध्ये आमिर म्हणाला, "तुम्हाला वाईट वाटलं असेल, कदाचित आवडलं नसेल, काहींना धक्का बसला असेल. पण आम्ही तुम्हाला इतकंच सांगू शकतो, की आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत. फक्त आमच्या नात्यात बदल झाला आहे पण आम्ही एकमेकांसोबत काम करत राहणार आहोत."

घटस्फोटानंतर काय म्हणाला आमिर?

'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं आमिरने स्पष्ट केलं.