esakal | आमीरनं भावाच्या तोंडावर सांगितलं की...
sakal

बोलून बातमी शोधा

Don’t have any interest in going to Hollywood: Aamir Khan

आमीरनं भावाच्या तोंडावर सांगितलं की...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परेफ्शनिस्ट bollywood mister perfectionist म्हणून आमिरची aamir khan ओळख आहे. तो त्याच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असतो. येत्या दिवसांत त्य़ाचा लाल चढ्ढा सिंग हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्य़ाच्या या चित्रपटाची चर्चा आहे. आजवर आमिरनं वेगवेगळ्या भूमिका करुन प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. त्यानं सोशल मीडियापासून फारकत घेऊन आता पूर्णवेळ कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. असे असताना त्याच्या परिवारातील सदस्य सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. त्याचा भाऊ फैजल खान faizal khan हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यानं गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्टिट केलं होतं. त्याच्याविषयी आमिरनं एक विधान केलं होतं. त्याची चर्चा होताना दिसत आहे.

आमिरनं आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो काही चांगला अभिनेता नाही. त्यानं अभिनयाशिवाय जी काही कामं आहेत त्याकडं लक्ष द्यावं आणि ते काम करावं. कारण अभिनय हे काही त्याचं क्षेत्र नाही. आणि ही गोष्ट आमिरनं त्याच्या तोंडावर सांगितली होती. जेव्हा फैजल खान बॉलीवूडमध्ये आला होता तेव्हा त्याचे अनेक चित्रपट हे फ्लॉप झाले. त्यावरुन आमिरनं आपली कडवट प्रतिक्रिया त्याला दिली होती. सध्या या दोन भावांमध्ये वाद सुरु असून त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहत्यांना वाचायला मिळत आहे.

फैजलनं अभिनय सोडून इतर कुठलंही काम करावं. अशी इच्छा आमिरची होती. फैजलला जेव्हा आपल्या अभिनयाबद्गल कळलं तेव्हा त्यानं आमिरशी संपर्क साधला होता. तेव्हा आमिरनं त्याला सांगितलं होतं की, तुझे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. अशावेळी तु दुसऱ्या एखाद्या पर्यायाचा विचार करावा. यावर फैजलचं असं म्हणणं आहे की, आमिरला वाटतं की मी चांगला अभिनेता नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे कधीही काम मागितलं नाही. आणि त्याला मदतीसाठी आवाहनही केलं नाही. मी एक भावाच्या नात्यानं फैजलला नेहमीच सपोर्ट केला. त्याची प्रगती पाहून मला नेहमीच आनंद झाला. त्याचं यश पाहून मला कधीही वाईट वाटलं नाही.

गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद सुरु झाले आहेत. फैजल म्हणतो, मी कुटूंबियांना भेटणं बंद केलं आहे. त्याची कारणं वेगळी आहेत. आमच्यामध्ये काही गोष्टींवरुन वाद झाले आहेत. परिवाराशी वाद करण्यापेक्षा मी त्यांच्यापासून वेगळं झालेलं चांगलं. असा विचार करुन मी बाहेर पडलो आहे. असं फैजलनं सांगितलं आहे.

loading image
go to top