esakal | गणपती दर्शनासाठी अंबानींच्या घरी आलेल्या आमिरचा सिंपल अंदाज; नेटीझन्स फिदा
sakal

बोलून बातमी शोधा

amir khan s look in the amabani s party

मुकेश अंबांनींनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या घरी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडच्या कलाकारांसाठी आणि काही खास मंडळींना या पार्टीचं आमंत्रण होतं.

गणपती दर्शनासाठी अंबानींच्या घरी आलेल्या आमिरचा सिंपल अंदाज; नेटीझन्स फिदा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मुकेश अंबांनींनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या घरी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडच्या कलाकारांचे आणि काही खास मंडळींना या पार्टीसाठी आमंत्रण होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष लागून होतं ते तिथं उपस्थित असलेल्या कलाकारांकडे होते. पण, अभिनेता आमिर खानने सर्व लक्ष वेधून घेतले होते. कारणही तसेच होते, तो चक्क साध्या चप्पलमध्ये पार्टीसाठी आला होता.

साध्या पांढऱा कुडता आणि काळी चप्पल घालून तो या पार्टीला आला होता, असे असले तरी नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा हा हटके अंदाज नेटीझन्सना चांगलाच पसंद पडला आहे. आमिरचा साधेपणा यातून दिसतोय आणि तोच चाहत्यांना आवडला आहे !

दरम्यान, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. बॉलिवूडच्या कलाकारांसोबतच मराठमोळ्या तारकांच्या घरीदेखील बाप्पाची स्थापना झाली आहे. त्यामुळे कालपासूनच सोशल मीडियावर कलाकारांचे गणपतीसोबतचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. अमिताभ, माधुरी, अनिल,आमिर, आलिया, रणबीर, कतरिना यांच्यासह सचिन तेंडुलकर, युवराज असे क्रिकेटरही सहपरिवारांसह या अंबानींच्या पार्टीमध्ये दिसून आले.


 

loading image
go to top