'रेगे'ने घेतलीये बिग बॉसमध्ये एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

सध्या बिग बॉसच्या घरात रोज भांडण, वाद सुरू आहेत. हे वाद रोज वाढतच चालले आहेत. प्रत्येक वीकमध्ये कोण बाहेर जाते आहे याची उत्सुकता आहे. पण या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणी सदस्य बाहेर जाण्याच्या ऐवजी एक नवा मेंबर घरात दाखल होणार आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात रोज भांडण, वाद सुरू आहेत. हे वाद रोज वाढतच चालले आहेत. प्रत्येक वीकमध्ये कोण बाहेर जाते आहे याची उत्सुकता आहे. पण या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणी सदस्य बाहेर जाण्याच्या ऐवजी एक नवा मेंबर घरात दाखल झाला आहे.

बिग बॉसच्या घरात आरोह वेलणकर या तरुण अभिनेत्याला प्रवेश दिला आहे. वाइल्ड कार्ड एंट्रीव्दारे आरोहने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉसच्या वीकएंड त्यामुळे जोरदार रंगणार यात शंका नाही. या आठवड्याचा स्टार परफॉर्मर जाहिर करताना बिगबॉस या नवीन मेंबरची घोषणा केली. तसेच बिग बॉस महेश मांजरेकर कोणाचा काय रोल राहील, कोण कसे वागेल हेही सांगितले.

आरोह वेलणकर हा 'रेगे' चित्रपटातील दमदार अॅक्‍टींगमुळे तो चर्चेत आला. आता त्याच्या बिगबॉसच्या घरातील एंट्री नंतर घरात काय नाट्य रंगणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaroh Velankar enter in bigg boss as wild card contestant