
Aashram 4 Release Date: ओटीटी प्लॅटफॉर्मवर ज्या मालिकेनं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली त्या प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम नावाच्या मालिकेचा (Aashram 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बाबा निरालाच्या भूमिकेत असणाऱ्या बॉबी देओलला या मालिकेनं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसून आले.
बॉबी देओल आज ज्या प्रसिद्धीच्या झोतात दिसून येतो त्यात त्याच्या आश्रम (bobby deol latest news) नावाच्या मालिकेचे मोठे योगदान आहे. असे म्हटले जाते. प्रकाश झा यांना त्या मालिकेच्या दिग्दर्शनाच्या वेळी अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. बॉबी देओलसह त्या (latest entertainment news) मालिकेत त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर, दर्शन कुमार, ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
यापूर्वी या मालिकेच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून चौथ्या सीझनची वाट पाहत होते. अखेर तो सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आश्रमचा तिसरा सीझन हा २०२२ मध्ये आला होता. आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर आश्रम ४ ही गेल्या वर्षी एमएक्स ओटीटीवर प्रदर्शित होणार होती. मात्र काही कारणास्तव ती झाली नाही. आता त्या मालिकेच्या चौथ्या सीझनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मीडियातील काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मालिका डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता मेकर्सच्यावतीनं आश्रम ४ चा एक छोटासा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. खरं तर याबाबत मेकर्सकडून कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर ज्या चर्चेला उधाण आले आहे त्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.