Aatmapaphlet: "कुणाचीही अस्मिता नसलेला सिनेमा मराठीत चालणं..", 'आत्मपॅफ्लेट'बद्दल 'ताली'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत

आत्मपॅफ्लेट सिनेमाचं चोहीकडे कौतुक होतंय
Aatmapaphlet marathi movie kshitij patwardhan post viral after watch movie
Aatmapaphlet marathi movie kshitij patwardhan post viral after watch movie SAKAL

Aatmapaphlet Movie News: सध्या मराठी मनोरंजन विश्वात आत्मपॅफ्लेट सिनेमाची बरीच चर्चा आहे. सिनेमा पाहून अनेक लोकं कौतुक करत आहेत. संपूर्ण मराठी इंडस्ट्री आत्मपॅफ्लेट सिनेमा पाहून सिनेमाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

अशातच YZ, डबल सीट आणि अलीकडेच रिलीज झालेल्या ताली या वेबसिरीजचा लेखक क्षितीज पटवर्धनने आत्मपॅफ्लेट सिनेमाचं कौतुक केलंय. पण कौतुक करताना क्षितीजने सिनेमाबद्दल रोखठोक वक्तव्य केलंय.

Aatmapaphlet marathi movie kshitij patwardhan post viral after watch movie
Mitali Mayekar: "तुझ्या बुद्धीच्या पलीकडे...!" नेटकऱ्याने टिका करताच मितालीचं सडेतोड उत्तर म्हणाली,"तुम्ही क्लास घेता का?"

क्षितीजची आत्मपॅफ्लेट सिनेमा पाहून खास पोस्ट

क्षितीज लिहीतो, "आत्मपॅम्फ्लेट हि मराठी प्रेक्षकांची लिटमस टेस्ट आहे." कुणाचीही अस्मिता नसलेला सिनेमा मराठीत चालणं फार गरजेचं आहे असं विधान मी मागे एका राउंड टेबल मध्ये केलं होतं. त्याचीच प्रचिती काल आली. जात, धर्म, पंथ, लिंग, इतिहास, राजकारण या सगळ्या अस्मितांच्या चौकटीमध्ये ना बसणारा पण या सगळ्यांच्या आडवा छेद काढणारा आत्मपॅम्फ्लेट काल पाहिला आणि वाटलं हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे.

आशिष माझा शाळेतला सिनियर, ज्या शाळेत त्याची हि गोष्ट फुलली, त्याच शाळेत त्याच वर्गवाणी वरून त्याचं नाव घेतलेलं मी ऐकलंय, तेव्हापासून त्याच्याबदल सुप्त आदर आणि कुतूहल दोन्ही होतं. सिनेमात ते पुन्हा पाहून शाळेचे सगळे दिवस, घटना (आपलं ही आत्मपॅम्फ्लेट ;)) असं सगळं लख्ख आठवलं.

क्षितीज पुढे लिहीतो, "पुर्वीच्या मनोरंजक जाहिरातींसारखा (मनो रंजन का बाप) हा सिनेमा मांडलाय, त्यामध्ये विनोद, उपहास, कोट्या, नाट्य, सामाजिक, राजकीय बदल आणि संदेश असं सगळं आहे. ते सगळं अतिशय परिणामकारक आहे. मुख्य म्हणजे त्याला अप्रतिम दृश्यात्मकता आहे. पणजी शाळेत जात असताना मागे मांजरी पासून वाघिणीची चित्र असणं या सारख्या अनेक सहज सुंदर प्रतीकांनी हा सिनेमा सजलाय.

शाळा, त्यातलं प्रेम, त्यासाठी खाल्लेल्या खस्ता, स्वतः बद्दल तयार होणारा गंड, भवताला बद्दल पडलेले प्रश्न, समोर कायम असेलल्या दोन वाटा ह्या सगळ्यातून सच्चेपणाने केलेली प्रेमाची निवड या सगळ्या वळणांवरून हा सिनेमा पुढे सरकतो आणि शेवटी शेवटी अतिशयोक्ती कडे जातो. या सगळ्याला परेशचं तिरकस निवेदन आहे. फक्त सुरुवातीला मजेदार वाटणारं हे निवेदन नंतर नंतर आगाऊ आणि रिपीटेटिव्ह वाटायला लागलं." (Latest Marathi News)

क्षितीज शेवटी लिहीतो, "हा सिनेमा जितका आशिषचा आहे तितकाच अविनाशचा आहे, (भीम मुडे ने अप्रतिम काम केलंय) आपलया पालकांनी ऐंशी नव्वदच्या दशकांत मुलांना जगण्याचे जे धडे वागण्यातून दिले त्याची सुंदर झलक अविनाश बेंडे मध्ये आहे, त्यांचा हसतमुख चेहरा सिनेमा संपला तरी आठवत रहातॊ. त्यांच्या पात्राला घेऊन आत्म पॅम्फ्लेटचा उत्तम प्रिक्वेल होऊ शकतो. मुलांची आणि पालकांची कामं सुंदर.

टँरेन्टीनो एका ठिकाणी म्हणाला होता कि "मेक इट पर्सनल इनफ सो यु फील एम्बॅरॅस्ड टू शेअर इट!" अनेक कलाकार वर्षानुवर्ष काम करूनही हे साधू शकत नाहीत, ते आशिषने पहिल्याच सिनेमात केलंय. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस (चांगल्या अर्थी) फार डेंजरस कलाकार होतो.

सिनेमा बद्दल ज्या गोष्टी खटकल्या त्या त्याला भेटून सांगेनच, पण तूर्तास हा सिनेमा बघणं आणि चालणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही अस्मितेशिवाय फक्त कलाकृती म्हणून सिनेमा चालला तर त्यात करणाऱ्यांचं ही यश आहे आणि बघणाऱ्यांचंही! नक्की पहा!!"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com