esakal | स्कॅम 1992 नंतर येतोय स्कॅम 2003; हर्षद मेहतानंतर आणखी एका घोटाळ्यावर वेबसीरिज
sakal

बोलून बातमी शोधा

abdul karim telgi the fake stamp paper scam convict who once showered rs 93 lakh in one night on bar dancer

तुम्हाला आठवतोय का तो व्यक्ती ज्यानं एका बारबालावर तब्बल 93 लाख रुपये उधळले होते.

स्कॅम 1992 नंतर येतोय स्कॅम 2003; हर्षद मेहतानंतर आणखी एका घोटाळ्यावर वेबसीरिज

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - तुम्हाला आठवतोय का तो व्यक्ती ज्यानं एका बारबालावर तब्बल 93 लाख रुपये उधळले होते. एवढी उधळपट्टी करणारा हा व्यक्ती कोण म्हणून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. शेवटी एका प्रकरणात तो सापडला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर जे समोर आलं ते चक्रावून टाकणारं होतं. अब्दुल करीम तेलगी असे त्या व्यक्तीचे नाव होते. एक फळविक्रेता असणारा माणून जेव्हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा करतो तेव्हा ते धक्कादायक असचं होत. गेल्या वर्षी स्कॅम 1992 मधील आरोपी हर्षद मेहता याच्यावर आलेल्या वेबसीरिज नंतर त्याचा दुसरा भाग आता तयार होणार आहे.

हर्षद मेहताचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आता तेलगीच्या घोटाळ्यावर वेबसीरिजची निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की, स्कॅम 1992 चा पुढचा भाग म्हणून स्कॅम 2003 च्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. त्या मालिकेचं नाव Scam 2003: The Curious Case of Abdul Karim Telgi’ असल्याची माहिती आहे. हंसल मेहता यांच्या द स्कॅम 1992 मालिकेला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. गेल्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून त्यांच्या मालिकेचे नाव घेतले गेले होते.

तेलगीच्या घोटाळ्यावर आधारित असलेली ही मालिका पत्रकार संजय सिंग यांच्या रिपोर्टर की डायरी या हिंदी पुस्तकावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन हंसल मेहता हे करणार आहेत. 1961 मध्ये कर्नाटकमधील खानापूर येथे जन्म झालेल्या अब्दुल तेलगीचा जन्म झाला होता. तेलगी आणि त्याचे दोन भाऊ आईला लोणच्याच्या धंद्यात मदत करायचे. शालेय शिक्षणानंतर तेलगीनं बेळगाव येथील एका महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली होती. पुढे तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत होता.

मोठं होण्याची स्वप्नं पाहणा-या तेलगीनं भारत सोडण्याचा निर्णय घेतला. तो सौदी अरेबिया मध्ये गेला. त्यानंतर काही काळानं पुन्हा मुंबईत आला. पुढे त्यानं एक ट्रॅव्हल एजंट म्हणून नोकरी सुरु केली. तेलगीनं जे काही केलं त्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. त्याने 1994 मध्ये एक मोठा घोटाळा केला.

बनावट मुद्रांक शुल्कचा घोटाळा करुन तेलगी प्रसिध्द झाला होता. मेहता यांच्या या मालिकेची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. मालिकेच्या चित्रिकरणाला कधी सुरुवात होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

 
 

loading image