Bigg boss 16: बिग बॉस’च्या घरात अब्दू रोजिकची दिवाळी जोरात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg boss 16
Abdul Razik

Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात अब्दुल राजिकची दिवाळी जोरात...

बिग बॉस 16 मधील सर्वात क्यूट स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा अब्दुल राजिक सध्या खूप चर्चेत आहे.बिग बॉसच्या घरात येण्याआधी पासूनच तो सोशल मीडियावर फेमस आहे. अब्दूचा चाहता वर्गही बराच आहे. बिग बॉसच्या घरातही तो सर्वांचा चाहता आहे. खुद्द सलमानही त्यांचा फॅन आहे. अब्दू रोजिक हा मुळ ताजिकिस्तानचा रहिवाशी असल्याने अब्दुची हि भारतील पहिली दिवाळी आहे. त्यामूळे ती जोरात होणं हे सहाजिकच होतं. बिग बॉसने त्याला दिवाळीच खास गिफ्ट दिलयं.

त्याची भारतातली पहिली दिवाळी खास करण्याचा बिग बॉसने पुरेपुर प्रर्यंत्न केला. अब्दुची दिवाळी साजरा करतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. यात बिग बॉस च्या घरात दिवाळीचा उत्सव साजरा करतांना दिसतात. या व्हिडिओत करण म्हणतोयं की आपल्या देशात अब्दुची पहिली दिवाळी आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांची दिवाळी  तो इथे आपला पाहुणा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी एक खास भेट आहे असं सांगतो. त्यानंतर तो करण अब्दूला त्याच्या भारतातील चाहत्यांनी त्याच्यासाठी पाठवलेल्या शुभेच्छांचा एक व्हिडीओही दाखवतो.

करणने आधी अब्दूला मिठाई खायला दिली आणि नंतर त्याच्यासाठी एक खास सोफा सेट आणला.  हा सोफा सेट त्याच्या उंचीचा आहे.सोफा आणताच अब्दू लगेच त्यावर जाऊन बसतो. छोटा सोफा पाहून अब्दू फारच खुश झालेला दिसतो.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर?

त्यानंतरच्या सोफ्यावर बसलेला आहे आणि सर्व स्पर्धक त्याच मनोरंजन करण्यासाठी त्यांच्या समोर नाचतांना दिसतात. अब्दूही त्यांच्या डान्स करतांना पाहत त्यांना कॉम्पलिमेंट देतोय. . अब्दू हा बिग बॉसमध्येही आणि बाहेरही सर्वाचे जास्त मनोरंजन करणारा स्पर्धक आहे.

हेही वाचा: Big Boss 4: 'मेघा घाडगे बाहेर पडली आता पुढचं टार्गेट...',तेजस्विनीनं नावच जाहीर केलं