'लागिरं झालं जी'नंतर आता झी मराठीवरील 'ही' मालिका होणार बंद

वृत्तसंस्था
Monday, 1 July 2019

मालिकेतील मायरा उर्फ अभिनेत्री अभिज्ञा भावेने मालिकेचे शुटिंग संपल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले असल्याने मालिका बंद होणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : झी मराठीवरील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार असल्याचे खुद्द सुबोध भावेने सांगितले होते. आता मालिकेतील मायरा उर्फ अभिनेत्री अभिज्ञा भावेने मालिकेचे शुटिंग संपल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले असल्याने मालिका बंद होणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिज्ञाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर मालिकेचे शुटिंग संपले असल्याचे सांगितले आहे. तिने विक्रांत सरंजामे उर्फ सुबोध भावे, गायत्री उर्फ इशा आणि मालिकेतील इतर कलाकारांसह फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना ‘तुला पाहते रे’च्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. आपण शेवट काय होणार याचा कधीच विचार करत नाही. अभिज्ञाचा मालिकेतील मायरा या पात्राचा प्रवास आता संपलाय असे तिने फोटो शेअर करत लिहिले.

दरम्यान, गायत्री दातारने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. सध्या मालिकेत इशाने विक्रांतला धडा शिकवण्यासाठी त्याची सर्व माणसे तोडली आहेत. विक्रांतच्या कृत्याचा त्याला पश्चाताप व्हायला हवा असा इशाचा हेतू असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhidnya Bhave Shares Last Photo Of Tula Pahate Re