मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या पतीला झाला कॅन्सर

Abhijna Bhave
Abhijna BhaveAbhijna Bhave news
Updated on

अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै याला नुकतेच कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. मेहुलने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आणि हॉस्पिटलमधून पत्नी अभिज्ञासोबतचे काही फोटो पोस्ट केले.

मेहुलने कॅप्शनसह फोटो शेअर केला की, "माझ्या आयुष्यात मी खूप कमी लोकांना भेटलो आहे, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वात मोठा आहे... तु चुकीची व्यक्ती निवडली आहेस..." असे त्याने कर्करोगालाच म्हटले. (Abhidnya Bhave's husband Mehul Pai diagnosed with cancer)

अभिज्ञा आणि मेहुलच्या मराठी इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आणि ते लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

अभिनेत्री मयुरी देशमुखने लिहिले की, "रॉकस्टार... तुझी काळजी घ्यायसा अभिज्ञा आहे, हा विजय निश्चितच तुझा आहे... खूप प्रेम आणि शक्ती" तर अभिनेत्री रुतुजा बागवेने लिहिले, “तुझ्यासाठी अधिक शक्ती, फायटर काळजी घ्या"

Mehul Pai's post
Mehul Pai's post

अभिज्ञाने (Abhijna Bhave) तिच्या पतीच्या आजाराविषयी अद्याप काहीही उघड केले नसले तरी ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करते ज्यामध्ये ती मेहुलच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते. लव्हबर्ड्सबद्दल सांगायचे तर अभिज्ञा आणि मेहुल 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. नंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 6 जानेवारी 2021ला या जोडप्याने लग्नगाठ बांधली. घटस्फोटित असलेले अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

कामाच्या आघाडीवर, अभिज्ञा ही एक लोकप्रिय मराठी आणि हिंदी टीव्ही अभिनेत्री आहे तर मेहुलची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com