Abhijeet Kelkar: अभिजीत लेकाला शिकवतोय स्वयंपाक! पोस्ट करत म्हणाला, खरे संस्कार पुरुषांवर..

Abhijeet Kelkar:
Abhijeet Kelkar:Esakal

Abhijeet Kelkar Video: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर हा नेहमीच चर्चेत असतो. मनोरंजन विश्वात त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून अभिजीतने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय असलेला अभिजीत हा सोशल मीडियावर देखील कमालिचा सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाहीच. तो अनेकदा बऱ्याच गंभीर मुद्यावर भाष्य करत असतो. त्याच्या पोस्टही व्हायरल होतात. त्याच्या सोशल मीडिया पोस्टही अनेकदा चर्चेत असतात.

आता त्याने पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओ त्याच्या लहान मुलाला तो स्वयंपाक करायला शिकतोय. त्याचा छोटा मुलगा चपाती लाटण्याचा प्रयत्न करत आहे. भलेही चपाती गोल होत नसली तरी छोटा मल्हार चपात्या लाटण्याचा प्रयत्न करतोय. अभिजीतने मल्हारचा हा व्हिडिओ शेयर केला मात्र या व्हिडिओच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.(Latest Marathi News)

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिजीतने लिहिलं की, “खरे संस्कार मुलांवर (पुरुषांवर) करण्याची गरज आहे आणि ती सुरुवात आपल्या घरापासूनचं व्हायला हवी”

या कॅप्शनसोबत त्याने चाहत्यांना एक संदेश देखील दिला आहे. पुर्वी बऱ्याच लोकांचा असा समज असायचा की केवळ मुलींनीच स्वयंपाक आणि किचनचे काम करावी. मात्र आता अस राहिलेलं नाही. मुलं देखील घरातील कामं करतात आणि किचनमध्ये उत्तम स्वयंपाक ही करतात. आता अभिजीत याने मुलांला घरातुनच असे संस्कार द्यायला हवेत असं अभिजीतने त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी छोट्या मल्हारचं कौतुक करतांना थकत नाही आहेत.

अक्षया नाईकने कमेंटमध्ये लिहिलं की, 'वाह दादा वाह सुंदर कॅप्शन' तर कोकण हार्टेड गर्ल यांनी 'या वयात मला एवढं पण येत नव्हतं' ..अशा कमेंट केल्या आहेत. तर दुसऱ्यानं लिहिलं की 'अगदी बरोबर', 'खुपच गुणी मुलगा आहे'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com