Abhijeet Shwetchandra: लगीनघाई ! आणखी एक प्रसिद्ध मराठमोळा अभिनेत्याचा 'शुभविवाह'

 Abhijeet Shwetchandra wedding
Abhijeet Shwetchandra weddingEsakal
Updated on

Abhijeet Shwetchandra wedding: सध्या मराठी मनोरंजन विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. नुकतच हास्यजत्रा फेम वनिता खरात हिने २ फेब्रुवारीला सुमीतसोबत लग्नबंधनात अडकली.

अजुनही या लग्नाची चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर सगळचं गाजलं त्यातच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधल्या ओमचाही साखरपुडा दणक्यात पार पडला. आता अजून एक मराठमोळा अभिनेता लग्न बंधणात अडकला आहे.

 Abhijeet Shwetchandra wedding
Shahid Kapoor: बॅकग्राउंड डान्सर ते सुपरहिरो... स्टारकिड असूनही शाहिदचं जीवन सोप नव्हतं....

स्टार प्रवाहवरील लक्ष्य मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांनही लग्नगाठ बांधली आहे. त्यानं सेजल वर्दे हिच्यासोबत २४ फेब्रुवारीला लग्न केलं आहे. केवळ कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे लग्न झालं. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरस झाले आहेत.

 Abhijeet Shwetchandra wedding
Urfi Javed New Look: 'तुला पाहून चेटकिणीलाही अटॅक यायचा',उर्फीचा नवा लुक व्हायरल..नेटकरीही घाबरले

१ जून २०२२ रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. ८ महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता या दोघांनी गुपचूप लग्नही उरकले आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. त्याचे चाहते आणि सहकलाकारही या नवदामपत्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे.

अभिजित श्वेतचंद्रबाबत बोलायचं झालं तर तो मूळचा अलिबागचा आहे. त्याने काही दिवस नोकरी केली आणि त्यानंतर नोकरीत रस नसल्यानं तो मनोरजंन क्षेत्राकडे वळाला. सुरवातीला त्यानं काही नाटकांत भाग घेतला आणि आता तो मालिका आणि चित्रपटात अभिनय करत आहे.

 Abhijeet Shwetchandra wedding
Riva Arora: 'मी काही १२ वर्षांची लहान मुलगी नव्हे!, मिका अन् करणसोबत रोमान्स वादावर रिवा अरोरा भडकली

त्याच्या बाजी, गणपती बाप्पा मोरया,साजणा , बापमाणुस अशा मराठी सिनेमांमध्ये त्याने काम केलयं तर अभिजित श्वेतचंद्र ची पत्नी सेजल वर्दे ही देखील याच क्षेत्रातील आहे. तिने अभिनयाबरोबरच मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे. सध्या अभिजित ‘शुभविवाह’ या मालिकेत दिसतोय. आणि मालिकेच्या नावाप्रमाणेच त्यानेही गुपचूप त्याचा शुभविवाह उरकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com