Abhijit Bichukale Accident : अभिजित बिचुकलेचा पुण्यात अपघात, डोक्याला दुखापत

अभिजित बिचुकलेचा अपघात झाला असून त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 Abhijit Bichukale  Bigg Boss 16
Abhijit Bichukale Bigg Boss 16 sakal
Updated on

Abhijit Bichukale bigg boss hindi fame : बिग बॉसमध्ये आपल्या हटके स्वभावानं आणि शैलीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे, चाहत्यांच्या चर्चेत असणाऱ्या अभिजित बिचुकलेचा अपघात झाला असून त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिजित सोबत त्याचे जे चार मित्र होते त्यांनाही दुखापत झाले आहे. अभिजित हा काही कामानिमित्तानं पुण्यात आला होता. आता त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आला आहे. मुळचा सातारचा असणाऱ्या अभिजित बिचुकले त्याच्या व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यात आला होता. अशी माहिती एका मराठी वृत्त वाहिनीनं दिली आहे.

Also Read - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

बिचुकले याच्या अपघाताचे वृत्त कळताच चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या अनेक मित्रांनी त्याच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून त्याची विचारपूस केली आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि बोलण्यामुळे कायमच चर्चेत असणाऱ्या बिचुकलेंचा अपघात मात्र चाहत्यांना काळजीत टाकणारा आहे.

 Abhijit Bichukale  Bigg Boss 16
Pathaan Trailer Released: टाइम स्टार्टस् नाऊ! दमदार ॲक्शनचा मसाला.. पठाणच्या ट्रेलरनं उडवला धुरळा..

महाराष्ट्राच्या मनोरंजन विश्वामध्ये अभिजित बिचुकले हे मोठे नाव आहे. हिंदी बिग बॉसमध्ये त्याचा सहभाग आणि त्यामध्ये त्यानं केलेली कामगिरी यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. सलमान पासून शाहरुखपर्यत सगळ्यांवर बिनधास्तपणे बोलणारा अभिजित हा कायमच बातमीचा आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे.

 Abhijit Bichukale  Bigg Boss 16
Pathaan Trailer: शाहरुखची शरणागती.. ट्रेलर मधनं गायब दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी

अभिजितचा अपघात कसा झाला याबाबत अजुन कोणतीही माहिती समोर आली नाही त्याच्या मित्रांवर देखील उपचार सुरु आहेत. चाहत्यांनी अभिजितला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com