कादंबरीत कोल्हापूरचे अनुभव - अभिराम भडकमकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या अभिराम भडकमकर यांची येत्या महिन्याभरात नवीन कादंबरी वाचकांच्या भेटीला येणार आहे. टाकाळा आणि एकूणच कोल्हापूरविषयीच्या अनुभवांची शिदोरी त्यातून रिती होणार आहे.

कोल्हापूर - चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या अभिराम भडकमकर यांची येत्या महिन्याभरात नवीन कादंबरी वाचकांच्या भेटीला येणार आहे. टाकाळा आणि एकूणच कोल्हापूरविषयीच्या अनुभवांची शिदोरी त्यातून रिती होणार आहे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गायन समाज देवल क्‍लबमध्ये त्यांचा सत्कार झाला, त्यावेळी दिलखुलास संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
 दरम्यान, देवल क्‍लबचे कार्यवाह अरुण डोंगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. लेखक विद्यासागर अध्यापक यांनी त्यांच्याशी संवाद खुलवला.  

श्री. भडकमकर म्हणाले, ‘‘मालिका, नाटकात रमलो असतानाच विशेष मुलांवर चित्रपटाचा विचार मनात आला. कोल्हापुरात आलो आणि चेतना मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांचे स्नेहसंमेलन पाहिल्यानंतर मग लगेचच या मुलांना घेऊन चित्रपटाचा निर्धार पक्का केला. ‘आम्ही असू लाडके’ हाच तो चित्रपट. लवकरच आता ‘झपाटलेला ३’ हा चित्रपट भेटीला येईल, तर ‘अधिपती’ हे नाटक रंगमंचावर येईल.’’

पुण्या-मुंबईची रंगभूमी म्हणजे रंगभूमी नव्हे, तर प्रत्येक प्रदेशाची म्हणून एक रंगभूमी असते आणि तिच्या जतन व संवर्धनासाठी केवळ स्पर्धांची प्रतीक्षा करण्यापेक्षा सातत्य महत्त्वाचे आहे. त्याशिवाय भव्य नाट्यगृहापेक्षा शंभर-दीडशे आसन क्षमतेची मिनी थिएटर ही आता काळाची गरज आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा (एमएसडी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांत ग्रामीण भागातील मुलांनाही आता शास्त्रशुद्ध 
नाट्य शिक्षण शक्‍य होणार असल्याचे श्री. भडकमकर यांनी सांगितले.

देवल क्‍लबच्या नाट्यविभागाचे प्रमुख डॉ. आशुतोष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. रसिका कुलकर्णी यांनी स्वागत केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhiram Bhadkamkar comment