Abhishek Bachchan Politics: अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? या पक्षाकडून निवडणुक लढवण्याच्या तयारीत

अभिषेक आता आई- बाबांप्रमाणे राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे
Abhishek Bachchan To Enter Politics After Amitabh & Jaya? Here's What We Know bollywood news
Abhishek Bachchan To Enter Politics After Amitabh & Jaya? Here's What We Know bollywood newsSAKAL

Abhishek Bachchan Politics News: आजकाल मराठी असो, हिंदी असो वा साऊथ.. अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसात काही मराठी कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक बॉलीवुड सुपरस्टार राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे अभिषेक बच्चन. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याबद्दल सध्या बातम्या चर्चेत आहेत म्हणजे, अभिषेक आता आई- बाबांप्रमाणे राजकारणात आपले नशीब आजमावणार आहे.

(Abhishek Bachchan To Enter Politics After Amitabh & Jaya? Here's What We Know bollywood news)

Abhishek Bachchan To Enter Politics After Amitabh & Jaya? Here's What We Know bollywood news
Aamir Khan: आमीर खानचं चीन प्रेम उतु गेलं, नेटकऱ्यांनी घेतली मिस्टर परफेक्शनीस्टची शाळा

अभिषेक आता राजकारणात?

खरं तर, रविवारी अभिषेक बच्चन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होऊ शकतो, अशी चर्चांना उधाण आलं.

इतकंच नव्हे तर 2023 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून अभिषेत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे असंही बोललं जात होतं. पण अभिषेक खरंच राजकारणात जात आहे का? याचा आढावा मिडीया रिपोर्टसनी घेतला.

राजकारणात एन्ट्रीबद्दल अभिषेकचं मत काय?

अभिषेक बच्चनने 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारण प्रवेशाबद्दल विचारण्यात आले होते. वडिलांप्रमाणे निवडणूक लढवता येईल का, असे विचारले असता

अभिषेक म्हणाला होता की, पडद्यावर राजकारण्याची भूमिका नक्कीच साकारू शकतो पण खऱ्या आयुष्यात राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही.

Abhishek Bachchan To Enter Politics After Amitabh & Jaya? Here's What We Know bollywood news
Mahesh Kothare: महेश कोठारे यांना मातृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे निधन

अभिषेकचा राजकारण प्रवेश निव्वळ अफवा

वेबसाइट 'ई-टाइम्स'नुसार, अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करत नाहीये. हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे खरे नाही. या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत, हे स्पष्ट झालंय

बच्चन कुटूंबाचा राजकीय इतिहास

अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत 1984 मध्ये राजकारणात नशीब आजमावले. त्यानंतर राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली. ती निवडणुक ते जिंकलेही होते.

मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बिग बींनी राजीनामा दिला होता. त्याचबरोबर अभिषेक बच्चनची आई आणि अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com