सलमान खानने दिलेल्या सल्ल्यानुसार कियाराने बदलले नाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

आलिया भट्टमुळे सलमानने मला माझे नाव बदलण्याचा सल्ला दिला. - कियारा अडवाणी

चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना आपल्या मुळ नावात बदल केलेले अनेक कलाकार आहेत. ज्यात आता कियारा अडवाणी हे नावही सामिल झाले आहे. 

बॉलिवूडमध्ये सध्या कियारा अडवाणीच्या नावाची चलती आहे. 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपल्याकडे लक्षं वेधून घेणाऱ्या कियाराचं खरं नाव कुणाला माहित आहे का? तर कियाराचं खरं नाव आहे 'आलिया'. 

एका सोशल मिडीया साईटच्या कार्यक्रमात बोलताना कियाराने खुद्द तिच्या नावात बदलाविषयी सांगितले. कियारा म्हणाली, 'आलिया हे माझे पहिले नाव आहे. पण आलिया भट्टमुळे सलमानने मला माझे नाव बदलण्याचा सल्ला दिला. कारण बॉलिवूडमध्ये एकाच नावाच्या दोन अभिनेत्री असू शकत नाही.' 

2014 ला 'फुगली' चित्रपटातून कियाराने आपल्या करियरची सुरवात केली होती. त्यानंतर 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'मशीन', 'लस्ट स्टोरीज', 'कलंक' आणि 'भारत आने नेनु', 'विनया विधेया रामा' अशा आणि तेलुगु चित्रपटात सुध्दा कियाराने काम केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to the advice given by Salman Khan Kiara Advani changed the name