आंदोलक शेतक-यानं अडवली अजय देवगणची कार; विचारला सवाल

actor ajay devgn car stopped by farmer sikh protester asked ajay to speak on issue
actor ajay devgn car stopped by farmer sikh protester asked ajay to speak on issue

मुंबई -  दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाची धग आता बॉलीवूडपर्यत आली आहे. त्याचा फटका काही कलाकारांना बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रख्यात अभिनेता अजय देवगणला त्यावरुन एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी काही कलाकारांनी सोशल मीडियावर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ठोस भूमिका घेतली होती. त्यात अक्षय कुमार, कंगणा राणावत, दिलजीत दोसांज, स्वरा भास्कर, तापसी पन्नु यांच्याशिवाय काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचाही समावेश होता.

त्याचं झालं अस की, एका शेतकरी आंदोलकानं अजयची कार अडवली. आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. तो अजयला म्हणाला की, तु शेतक-यांच्या आंदोलनाविषयी काही बोल. मात्र अजयनं त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांनी ते प्रकरण मिटवले. अजय त्यावेळी आपल्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निघाला होता. त्याचवेळी एकानं त्याची कार अडवून त्याला शेतकरी आंदोलनाविषयी आपली प्रतिक्रिया विचारली होती. त्या व्यक्तीचे नाव राजदीप सिंह असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली होती. मुंबईतील दिंडोशी भागातील एका ठिकाणी त्याच्या चित्रपटाचे शुटिंग चालू आहे. त्याचवेळी त्याची कार अडविण्यात आली होती. सोशल मीडियामध्ये प्रसिध्द झालेल्या फोटोमध्ये अजय आपल्या कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी राजदीप नावाचा व्यक्ती त्याच्याशी बोलताना दिसत आहे. त्याचे म्हणणे असे होते की, देशभर शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली असताना तुम्ही त्यावर काहीच का बोलत नाही. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे हा प्रकार सुरु होता. अखेर पोलिसांनी त्याच्यावर कलम 341, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांना याप्रकाराची माहिती कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अजयला पोलिसांनी चित्रिकरणाच्या ठिकाणी सोडले. त्यानंतर त्यांनी राजदीप नावाच्या व्यक्तीला अटक केली. अजयनं अशावेळी त्या आंदोलनात भाग घेतला होता जेव्हा पॉप स्टार रिहानानं त्या आंदोलनावरुन व्टिट केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com