Bholaa Box Office Collection: अजय देवगणच्या 'भोला'ने 50 कोटींचा आकडा केला पार, जाणून घ्या सहाव्या दिवसाची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajay devgn

Bholaa Box Office Collection: अजय देवगणच्या 'भोला'ने 50 कोटींचा आकडा केला पार, जाणून घ्या सहाव्या दिवसाची कमाई

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा चित्रपट भोला बॉक्स ऑफिसवर संथ गतीने चालत आहे. रामनवमीच्या दिवशी भोला रिलीज झाला होता. अजय देवगणने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन-थ्रिलर भोलाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाने 11 कोटींची ओपनिंग केली होती आणि आता सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. वीकेंडला भोलाच्या कमाईत कमालीची झेप होती, मात्र सोमवार आणि मंगळवारी कमाईचे आकडे मंद झाले. भोलाने मंगळवारी किती कोटींचा व्यवसाय केला ते जाणून घेऊया.

अजय देवगणचा भोला चित्रपट वीकेंडला चांगला होता पण आता चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. सहाव्या दिवशी भोलाची कमाई फारच कमी होती. रिपोर्टनुसार, भोलाने मंगळवारी म्हणजेच 6 व्‍या दिवशी 4.50 कोटी कमावले आहेत. भोलाने सोमवारी 4.50 कोटींची कमाई केली होती. मात्र, आत्तापर्यंत भोलाची एकूण कमाई ५३.२८ कोटी झाली आहे.

भोलाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी चित्रपटाचे लाइफ टाईम कलेक्शन 100 कोटी असू शकते असे मानले जाते. हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून येत्या 2 वीकेंडमध्ये कोणताही मोठा चित्रपट रिलीज न झाल्याने हा चित्रपट 100 कोटींच्या आसपास पोहोचू शकतो.

आता 21 एप्रिलला सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत भोला 100 कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे.

अजय देवगण आणि तब्बूची जोडी चाहत्यांनी मागील अनेक चित्रपटांमध्ये पसंत केली आहे. भोलामधील तब्बूच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमला पॉल, गजराज राव आणि इतर अनेक कलाकारांनी आपले उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवले आहे.