
मुंबई-सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप तणावाचं वातावरण आहे. दिग्गजांच्या निधनाने बॉलीवूडवर आधीच शोककळा पसरली आहे. एकामागोमाग एक धक्के बॉलीवूडला मिळत असताना आता आणखी एक दुःखद बातमी समोर येतेय. बॉलीवूड अभिनेता अली फजलच्या आईचं लखनऊमध्ये निधन झालं आहे. अलीने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. सोबतंच त्याने त्याच्या आईचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
अली फजलने त्याच्या सोशल मिडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. अलीने ट्वीटरवर लिहिलंय, 'मी तुझ्या हिस्स्याचं तुझ्यासाठी जगेन. मिस यू अम्मा. इथ पर्यंतच होतं आपलं, का माहित नाही. तु माझ्या सृजनशीलतेचा एक स्त्रोत होतीस. माझं सगळंकाही तु होतीस. पुढे शब्द नाही आहेत. लव यु. अली.'
अलीच्या प्रवक्त्याने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अतिशय दुःखी होऊन हे सांगाव लागत आहे की, अली फजलच्या आईचं १७ जुनला सकाळी लखनऊमध्ये अचानक निधन झालं. आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना करत आहोत. अली त्या सगळ्यांचा आभारी आहे ज्यांनी या कठीण काळात त्याला आधार दिला.'
अलीने त्याच्या चाहत्यांचे देखील आभार मानले आहेत. या कठीण काळात त्याच्या चाहत्यांकडूनही त्याला आधार मिळाला असल्याचं प्रवक्त्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्ये अली त्याच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी त्याच्या सोशल मिडियावरुन अपडेट शेअर करत असतो.
सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अली शेवटचा प्रस्थानम या सिनेमामध्ये दिसून आला होता. अलीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर अली आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा या वर्षाच्या सुरुवातीला लग्न करणार होते मात्र कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांचं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
actor ali fazal mother passes away in lucknow after health complications
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.