esakal | 'बिहारमध्ये माझा बलात्कार झाला असता'
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Ameesha Patel says felt unsafe on Bihar campaign

अमिषा ही 26 ऑक्टोबर रोजी लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार प्रकाश चंद्र यांच्या प्रचारासाठी गेली होती. यावेळी प्रकाश यांच्याकडून धमकावल्याचा आरोपही अमिषाने केला आहे.

'बिहारमध्ये माझा बलात्कार झाला असता'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सेलिब्रेटींना घेऊन येणे ही काही नवीन गोष्ट नाही. त्या सेलिब्रेटींना सुरक्षा देण्याची जबाबदारी त्या संबंधित उमेदवारावर असते. ब-याचदा रॅलीदरम्यान मतदारांकडून त्या सेलिब्रेटींनाही धक्काबुक्की केल्याचे प्रकार घडले आहेत. बॉलीवुडची अभिनेत्री अमिषा पटेलही बिहारमध्ये एका रॅलीसाठी गेली. आपला तिथला अनुभव म्हणजे एक दुखद अनुभव असल्याची प्रतिक्रिया अमिषाने दिली आहे.

अमिषा बिहारमध्ये लोकशक्ती जनपार्टीच्या एका उमेदवाराच्या रॅलीला गेली होती. बिहारमधील डोडनगर भागात रॅलीसाठी गेलेल्या अमिषाला तिथे एका वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. मात्र त्या उमेदवाराने अमिषाच्या आरोपाचे खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमिषा म्हणते, मी ज्यावेळी त्या प्रचाराच्या ठिकाणी गेली त्यावेळी मला माझा बलात्कार होईल असे वाटले. तसेच मला मारुन टाकतील अशी भीती वाटायला लागली. प्रचारा दरम्यान आलेल्या अनुभवावरुन या प्रसंगातून केव्हा माझी सुटका होईल असे वाटत होते. अमिषाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तिने आपल्याला आलेल्या भीतीदायक अनुभवाचा प्रसंग सांगितला आहे. बिहारमध्ये गेल्यावर कशाप्रकारे आपल्याला असुरक्षित वा़टू लागते याबद्दल ती बोलली आहे.

बिहारमधील त्या रॅलीतील तो अनुभव माझ्यासाठी एक दु;खद स्वप्न असल्याचे तिने म्हटले आहे.  प्रचारावेळी माझ्यासमवेत लोकं होती. मी खुप घाबरलेली होते. माझ्याकडे कुठल्याप्रकारचा पर्याय नव्हता. मी कधी मुंबईला पोहचेल असे मला वाटत होते. अमिषा ही 26 ऑक्टोबर रोजी लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार प्रकाश चंद्र यांच्या प्रचारासाठी गेली होती. यावेळी प्रकाश यांच्याकडून धमकावल्याचा आरोपही अमिषाने केला आहे. तसेच तिला ब्लॅकमेलिंग करुन असभ्य वर्तणूक केल्याचे म्हटले आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी गेला असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याचे अमिषाने सांगितले आहे. प्रकाश यांनी    जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप अमिषाने केला आहे.  यावेळी अमिषाने सनरुफ कारने रोड शो केला होता.

अमिषा म्हणाली, “ प्रकाश हे लोकांना ब्लॅकमेल करतात आणि धमकावतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावले आणि गैरवर्तन केले. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगले बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडले त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगले बोल असे सांगितले.”