esakal | 'तु आहेस हिंदू विरोधी': आमिर खान जाहिरातीवरून ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Amir khan

'तु आहेस हिंदू विरोधी': आमिर खान जाहिरातीवरून ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलिवूडमधील कलाकारांनी केलेल्या जाहिरातींवरून वाद होण्याच्या प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. मग अमिताभ यांची जाहिरात असो, आलियाची असो वा अन्य कुणा कलाकाराची त्यावरून काही ना काही वाद निर्माण होत आहेत. अलिकडेच आलियाने केलेल्या एका जाहिरातीचा वाद ताजा असतानाच आता आमिर खानच्या जाहिरातीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. आमिरने सीएट टायरची जाहिरात केली. या जाहिरातीवरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीवरून आमिर खान हा हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

आमिरने सीएट टायरची जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये आमिर एका मुलाला सांगतो की, अनार, सुतळी बॉम्ब, भुईचक्र हे सर्व फटाके आपली टीम जिंकली तर नक्की फोडणार आहोत. परंतु ते रस्त्यावर नाही. कारण रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाही तर गाड्या चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे आपल्याला फटाके फोडायचे आहेतच परंतु ते सोसायटीच्या आवारात रस्त्यावर नाही. सीएट टायरची ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. इतकेच नाहीतर या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे आमिर खान हा हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

या जाहिरातीमुळे नाराज झालेल्या युझर्सनी आमिरला आणि सीएट टायर्सना ट्रोल करत ते हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. एका युझरने लिहिले आहे की, 'बॉलिवूडचे स्पेशल लोक हिंदू सणांचा नेहमी दूरलक्ष करतात. तरी देखील हिंदू लोक त्यांचेच सिनेमे पाहतात.'

loading image
go to top