अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा कांड, सोशल मीडियावर फेक अकाउंट..

सोशल मीडियाचा वापर ठरतोय घातक, अमोल कोल्हे यांना आला धक्कादायक अनुभव
actor amol kolhe shared post about someone who create his fake instagram account and Extorting money
actor amol kolhe shared post about someone who create his fake instagram account and Extorting money sakal

amol kolhe : अभिनयातून प्रेक्षकांची आणि राजकीय विश्वातून जन समान्यांची मनं जिंकणारे खासदार अमोल कोल्हे आज भलत्याच अडचणीत सापडले आहेत. राजकीय आणि मनोरंजन विश्वात सक्रिय असल्याने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोशल मिडियावरही सक्रिय असतात. पण आज हाच सोशल मोडिया त्यांच्यासाठी डोक्याला ताप झाला आहे. त्यामागे कारणही तसच आहे. अमोल कोल्हे यांच्या नावे कुणीतरी खोटे इनस्टाग्राम अकाऊंट तयार करून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (actor amol kolhe shared post about someone who create his fake instagram account and Extorting money)

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. कधी मनोरंजन विश्वातील घडामोडी तर कधी राजकीय फटकेबाजी यामुळे सर्वांचे लक्ष अमोल कोल्हे यांच्याकडे लागलेले असते. त्यांचा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा त्यांचं चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आज मात्र त्यांच्यावर मोठा धक्कादायक प्रसंग ओढवला आहे. याबाबत त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोहाळ मीडिया अकाऊंट वरुण माहिती दिली आहे.

अमोल कोल्हे यांच्या नावाने खोटे सोशल मीडिया अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक केली जात आहे. या व्यक्तीने अगदी अमोल कोल्हे यांच्या सारखेच तंतोतंत दिसणारे इंस्टाग्राम अकाउंट उघडले आहे. संबंधित व्यक्ती अमोल कोल्हे यांच्या नावाने लोकांकडे पैसे मागत आहे. हा प्रकार समोर येताच अमोल कोल्हे यांनी या प्रकाराचे स्क्रीनशॉट शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे लिहितात, ''@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचं इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या.' असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com