सुशांतसाठी वाढदिवस साजरा करणार नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 December 2020

अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली  होती. या प्रकरणाशी संबंधित अनेक सेलिब्रेटींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

मुंबई - अभिनेता आणि निवेदक म्हणून प्रसिध्द असलेल्या शेखर सुमन यांनी केलेल्या व्टिटमुळे ते चर्चेत आले आहेत. ते व्टिट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित आहे.

शेखर हे येत्या 7 डिसेंबर रोजी आपला जन्मदिवस साजरा करत आहे. मात्र यावर्षी तो नेहमीप्रमाणे साजरा करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. याचे कारण देताना त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला आहे.अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली  होती. यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेक सेलिब्रेटींना पोलिसांनी  चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकणाचा तपास कुणाकडे द्यायचा यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर सीबीआयकडे तो देण्यात आला. मध्यंतरी या तपासानं वेगळं वळण घेतलं होतं. त्यातून ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते.

यातून ब-याच कलाकारांना चौकशीसाठी अंमली पदार्थ विभागाने बोलावले होते. यामुळे सुशांतला पूर्णपणे न्याय मिळाला नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यापैकी शेखर सुमन एक आहेत. आपल्या व्टिटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की,  मी येत्या 7 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस साजरा करणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman)

सुशांतसाठी तर मी एवढं नक्कीच करु शकतो. यावेळी वाढदिवस साजरा करण्यासाठी मला अजिबात उत्साह नाही. त्याच्याऐवजी मी देवाकडे अशी प्रार्थना करेल की, सुशांतच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे. आणि या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. 

कंगणाशी भांडला, दिवसभरात 4 लाख फॉलोअर्स वाढले

यापूर्वीही शेखर सुमन यांनी 27 नोव्हेंबरला एक व्टिट केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की,  या प्रकरणात ज्या तपासयंत्रणा काम करत आहेत त्यांनी आतापर्यच चांगले काम केले आहे. तपासात अडथळा आणणा-यांना अटक केली आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती पुरेसे पुरावे न आल्याने आणखी वाट पाहावी लागत आहे. 14 जून रोजी आपल्या राहत्या घरात सुशांतने केलेली आत्महत्या अजूनही संशयाच्या घे-यात अडकली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor anchor Shekhar suman tweeted no justice to sushant no birthday celebration