esakal | वल्चरच्या सर्वोत्तम 100 चित्रपटात भारताचे तीन चित्रपट 
sakal

बोलून बातमी शोधा

actor and director aamir khan lagaan satyajit rays apur sansar best movie ending films in world vulture made top 101 list

सर्वोत्कृष्ठ संकलन, सर्वोत्कृष्ठ शेवट अशा दोन कॅटगिरीत 101 सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे.

वल्चरच्या सर्वोत्तम 100 चित्रपटात भारताचे तीन चित्रपट 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपट अभ्यासक, जाणकार, समीक्षक यांनी सर्वोत्तम चित्रपटांची नावे प्रसिध्द केली आहेत. कथेचा विषय, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, अभिनय यासारख्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन ती यादी प्रसिध्द केली गेली आहे. त्याच धर्तीवर वल्चर नावाच्या एका चित्रपट प्रेमी संकेतस्थळानं सर्वोत्तम चित्रपटांची यादी जाहिर केली असून त्यात बेस्ट मुव्ही एडिटींगच्या यादीत भारताच्या तीन चित्रपटांना स्थान मिळालं आहे.

महान दिग्दर्शक सत्यजित रे यांचा अपूर संसार, आशुतोष गोवारीकर यांच्या लगान आणि मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे चित्रपटांचा समावेश आहे. वास्तविक सलाम बॉम्बे या चित्रपटाला त्या यादीत स्थान मिळालेलं नसलं तरी त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ठ संकलन, सर्वोत्कृष्ठ शेवट अशा दोन कॅटगिरीत 101 सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे. तीन भारतीय चित्रपटांना वल्चरने बनवलेल्या बेस्ट मुव्ही एंडिंगच्या यादीत स्थान मिळाले आहे. ही मात्र गौरवाची बाब म्हणता येणार आहे.

सत्यजित रे यांच्या अपु ट्रायलॉजीनं जगभर प्रसिध्दी मिळवली. आजही जगातील विविध चित्रपट संस्थामधील चित्रपट विषयक अभ्यासक्रमात रे यांच्या त्या तीन चित्रपटांचा समावेश केला गेला आहे. लगाननंतर गोवारीकर यांचे नाव प्रत्येक भारतीयाच्या मनात जाऊन बसले. या चित्रपटानं ऑस्करपर्यत मजल मारली होती. मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे चित्रपटाविषयीही अशीच गोष्ट सांगता येईल. हे तीनही चित्रपट अभ्यासक, जाणकार - समीक्षक आणि रसिक प्रेक्षक यांच्या आवडीच्या आहेत. असे सांगता येईल.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान'ला या यादीत 90 वे स्थान देण्यात आले आहे. तर सत्यजित रे यांच्या 1951 च्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाला 41 वा क्रमांक मिळाला. ही यादी तयार करणा-या टीमने प्रत्येकाला स्थान मिळावे म्हणून प्रत्येक दिग्दर्शकाचा चित्रपट पाहिला. असे वल्चरनं सांगितले आहे. आम्ही चित्रपटाचा शेवट पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे शीर्षक त्याच्या शेवटासोबत जुळणे आवश्यक होते. त्यानेच वल्चरच्या टीमला चित्रपटाशी कनेक्ट केले. वल्चरने आपल्या वेबसाइटवर या सर्व 101 चित्रपटांचे एंडिग सीनदेखील शेअर केले आहेत.

अपूर संसार हा चित्रपट सत्यजीत रे यांच्या वतीने वर्ल्ड सिनेमाला दिलेले सर्वात मोठे योगदान आहे. वेदना, दुःख आणि थेट अंतःकरणास स्पर्श करणारा अंत आहे. त्यामुळे या यादीमध्ये स्थान मिळविण्यात हा चित्रपट यशस्वी झाला.