esakal | राणा यांनी सांगितले की, सहा एप्रिलला मी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतलं होतं.
sakal

बोलून बातमी शोधा

actor ashutosh rana corona positive

व्हॅक्सिन घेऊनही आशुतोष राणाला झाला कोरोना; पोस्ट व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राज्यातील मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी शासनानं प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आता बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आशुतोष राणा याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. येत्या काळात कोरोनाचा उद्रेक आणखी वाढणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी य़ावेळी केले आहे.

राणा यांनी सांगितले की, सहा एप्रिलला मी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतलं होतं. तरीही मला कोरोना झाला आहे. मी आणि पत्नीनं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं होतं. त्यावेळी राणा यांची पत्नी रेणूका शहाणे यांनीही व्हॅक्सिनेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. राणा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, आजपासून भारतीय नववर्षाला प्रारंभ होत आहे. यावेळी दुर्गा मातेचे स्मरण केले जाईल. मात्र आजच्या अशा शुभ दिवशी मला कोरोना झाल्याचे कळले. त्यावेळी वाईट वाटले. आपल्याला काय झाले आहे याची वेळेवर माहिती मिळणे यासारखा शुभ योगायोग नाही.

ज्यावेळी मला कळले की कोरोना झाला आहे त्यानंतर मी या आजारातून मुक्त कसे व्हायचे याचा विचार करु लागलो. त्यावेळी मला माझ्या गुरुजींची आठवण झाली. मी आता माझ्या संपूर्ण परिवाराची टेस्ट केली आहे. त्या सगळ्यांचा रिपोर्ट उद्या येणार आहे. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या सर्व मित्रांनी आपली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन राणा यांनी केले आहे. यापूर्वी अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.