लाॅकडाऊनमध्ये आयुष्मान खुराना कोणत्या विषयाचे धडे घेतोय पाहा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aayushman

आयुष्मान आता भारतीय इतिहासाचे धडे घेणार आहे. हे धडे तो ऑनलाईन कोर्सद्वारे घेणार आहे. या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून तो भारतीय इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळवणार आहे.

लाॅकडाऊनमध्ये आयुष्मान खुराना कोणत्या विषयाचे धडे घेतोय पाहा...

मुंबई ः सध्या आयुषमान खुरानाच्या चारो उगलीयां घीमध्ये आहेत. त्याचे लागोपाठ प्रदर्शित बरेली की बर्फी, शुभमंगल सावधान, अंधाधुन, आर्टिकल १५, ड्रीमगर्ल...असे सगळेच चित्रपट यशस्वी झालेले आहेत. सध्या स्टारडम त्याच्या घरी पाणी भरत आहे. कित्येक निर्माते व दिग्दर्शक त्याला साईन करण्यासाठी धडपडत आहेत. तोदखील विचारपूर्वक चित्रपट साईन करीत आहे. कोणतेही येतील ते चित्रपट साईन न करता ठराविक आणि आपल्या आवडीचे चित्रपट तो घेत आहे. निर्माते त्याला त्याची योग्य अशी किंमतही देत आहेत. एखादी गोष्ट आवडली नाही तर नकार देताना तो सहसा कचरत नाही. मग तो कुठलाही दिग्दर्शक असो.

हे ही वाचा - कोरोनाच्या लढाईत सेलिब्रिटींचं 'आय फॉर इंडिया'

प्रियदर्शनसारख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करण्यास त्याने नकार दिला. यावरून तो किती चुझी आणि आपल्या मतांवर ठाम असतो हे लक्षात येते. एखादी संवेदनशील गोष्ट सहज व सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात तो कमालीचा माहीर आहे आणि म्हणून त्याचे चित्रपट सगळ्यांना आवडतात. नेहमीच अभिनेता आयुष्मान  खुराणा नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो. तो नेहमीच नवीन ज्ञानाच्या शोधात असतो, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात आणखीन भर पडेल. 

सध्या सर्वत्र लॉकडाऊन असताना आयुष्मानकडे बराच वेळ आहे. याचा तो पुरेपूर वापर करून घेत आहे. आयुष्मान आता भारतीय इतिहासाचे धडे घेणार आहे. हे धडे तो ऑनलाईन कोर्सद्वारे घेणार आहे. या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून तो भारतीय इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळवणार आहे.

याबाबत आयुष्मान म्हणाला की, 'मला भारतीय इतिहासाची खूप आवड आहे आणि आपला इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता देखील आहे. आपला इतिहास आकर्षक आहे, समृध्द आहे, संस्कृतीने भरलेला आहे. माझ्या मते आपल्या सर्वांना आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकण्याचा, माहिती मिळवण्याचा आणि ज्ञान प्राप्त करण्याचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्याचा फायदा मी घेत आहे. आणि त्यामुळेच भारतीय इतिहासाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मी ऑनलाईन धडे घेत आहे.' सतत काही ना काही तरी नवीन गोष्ट शिकायची जिद्द ठेवणारा आयुष्मान त्याला मिळालेला वेळेचा चांगलाच सदुपयोग करत आहे. 

actor ayushman khurana is learning Indian history during lockdown

loading image
go to top