esakal | आयुषमाननं दिली गोड बातमी, कुठली? वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

 actor ayushmann khurrana and director anubhav sinhas film anek to release on sep 17

गेल्या अनेक दिवसांपासून अनुभव सिन्हाच्या य़ा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्याविषयी प्रेक्षकांना कुतूहल होते.

आयुषमाननं दिली गोड बातमी, कुठली? वाचा..

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई- आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या आयुषमान खुराणानं सोशल मीडियावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या नव्या चित्रपटाविषयी सांगून प्रेक्षकांना गोड बातमी दिली आहे. तो पुन्हा अभिनव सिन्हा यांच्याबरोबर काम करणार असून त्या चित्रपटाचं नाव अनेक असे आहे. या दोघांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनुभव सिन्हाच्या य़ा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्याविषयी प्रेक्षकांना कुतूहल होते. आयुषमाननं सोशल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर केली आहे. त्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरु आहे. आर्टिकल 15 मध्ये ते यापूर्वी दिसले होते. अभिनवचा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एका वेगळ्या चित्रपटातून एकत्र येऊन वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. त्या चित्रपटाचा विषयही तितकाच मनोवेधक आणि मनोरंजक आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

सध्या त्या चित्रपटाचा एक लूक आयुषमाननं शेअर केला आहे. तो सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माते, दिग्दर्शक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. अद्याप चित्रपटाच्या कथेबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. अनुभव आणि आयुषमान यांनी एकत्रितपणे क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 2019 मध्ये त्या दोघांचा क्राईम ड्रामा मुव्ही आर्टिकल 15 प्रदर्शित झाला होता. त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. आता अभिनवच्या दुस-या चित्रपटाबद्दलही सर्वांना कमालीची उत्सुकता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  अनुभवची आतापर्यतची सर्वात महागडी फिल्म म्हणून अनेकविषयी सांगता येईल. मुल्क, थप्पड या सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी पसंद केले होते. त्यामुळे अनुभव यांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार होत असल्याचे दिसून आले आहे.