Fri, March 31, 2023

Bharat Ganeshpure Mother Dies: 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचे निधन..
Published on : 9 March 2023, 8:25 am
Bharat Ganeshpure mother Died: मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे. भारत गेली अनेक वर्षे 'झी' मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
भारत गणेशपुरे यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज गुरुवार, 9 मार्च रोजी भारत गणेशपुरे यांना मातृशोक झाला आहे. भारत यांच्या आई श्रीमती मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे गणेशपुरे यांच्या अमरावती येथील घरी आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भारत यांचे बंधु मनीष यांच्या राहत्या घरातून रहाटगाव स्मशानभूमीकरता संध्याकाळी ५ च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.