Hemant dhome: घरापासून दूर गेल्यावर.. हेमंत ढोमेची पोस्ट होतेय व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor hemant dhome shared post about his experience in England when he completed his degree

Hemant dhome: घरापासून दूर गेल्यावर.. हेमंत ढोमेची पोस्ट होतेय व्हायरल..

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा झिम्मा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. लवकरच त्याचा 'सनी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आज त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने परदेशातील आठवणींना उजाळा दिला आहे. (actor hemant dhome shared post about his experience in England when he completed his degree )

हेमंत काही वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला होता. याबाबतच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तेथील एक जुना फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. घरापासून दूर गेल्यानंतर मनात काय भावना असतात? हे हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट मधून सांगितले आहे.

तो म्हणतो, “मी माझं एम. एससी (Masters in wildlife conservation) पूर्ण करायला दोन वर्ष केंट युनिर्वसिटी, इंग्लंडमध्ये होतो. त्या दोन वर्षांनी माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. घरापासून दूर गेल्यावर आपण स्वतःच्या अजून जवळ जातो एवढं नक्की.” तसेच घरापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं असं त्याने आपल्या इतर मित्रांनाही विचारलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.