व्हिडिओ व्हायरल; नाचताना जॉनी लिव्हर यांचा गेला तोल

actor Johnny lever fall from sofa while dancing with Jamie lever and Jesse lever video viral
actor Johnny lever fall from sofa while dancing with Jamie lever and Jesse lever video viral
Updated on

मुंबई - ज्या विनोदी कलाकाराच्या अभिनयानं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तो अभिनेता जॉनी लिव्हर अद्यापही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहे. बॉलीवूडमध्ये जे कोणी विनोदी अभिनेते आहेत त्यांच्यात जॉनी लिव्हरचे नाव फार वरचे आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या एवढं मोठं होण्याची इच्छा असते. अशावेळी जॉनी लिव्हर नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करत असतात. सध्या जॉनी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आले आहेत. जॉनी लिव्हर डान्स करत होते अन अचानक असे काय झाले की जॉनी यांना धक्काच बसला.

डान्स करताना जॉनी यांचा बॅलन्स बिघडल्याची घटना समोर आली आहे. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या चाहत्यांचे प्रेम मिळवण्यात जॉनी आघाडीवर आहेत. चाहत्यांचे मनोरंजन करण्यात जॉनी सगळ्यात पुढे असतात. जॉनी यांची मुले जेमी लिवर आणि जस्सी लिवर यांनीही सोशल मीडियावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी जॉनी हे मुलांबरोबर डोन्ट टच मी नावाच्या गाण्यावर नृत्य केले आहे होते. त्यावेळी या गाण्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

त्या व्हिडिओमध्ये दिसुन येत आहे की, जॉनी लिव्हर, जेमी आणि जेस्सी यांच्यासह डान्स करतानाचा व्हिडिओ शुट केला आहे.  त्यावेळी ते डान्स करताना त्यांचा तोल जाऊन ते पडल्याचे दिसून आले आहे. जेमीनं शेअर केलेला व्हिडिओ फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर अनेकजण त्यांना कमेंटही करत आहे. त्या व्हिडिओमध्ये त्या तिघांचाही अंदाज कमालीचा सुंदर आहे. व्हिडिओ शेअर करताना जेमीनं लिहिलं आहे की, आमच्या डोन्ट टच मी, डान्सचा बीटीएस फुटेज. मला तुम्हा सगळ्य़ांबरोबर शेअर करावे लागत आहे.

त्या व्हिडिओला पाहून युझर्सनं लिहिलं आहे की, तुमचे वडिल एक मोठे कलाकार आहेत. तुम्ही दोघेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहात. याचा आनंद वाटतो. तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे. त्याशिवाय एका युझर्सनं कमेंट करताना लिहिलं आहे की, सर्वात भारी तिकडी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com